गणेश बिल्डर जागेचा वाद

गणेश बिल्डर जागेचा वाद
Published on

नव्या आराखड्यात रस्ता; मात्र, आराखडाच मंजूर नाही

बॉम्बे पार्कजवळील गणेश नगर स्कीम क्रमांक ३ च्या रस्त्याचा वाद

सोलापूर, ता. १७ ः बॉम्बे पार्कजवळील गणेश बिल्डरच्या स्कीम क्रमांक ३ चा रस्ता तात्पुरता सुरू झाला. हा वहिवाटीचा रस्ता पूर्वीच्या आराखड्यात नव्हता. नव्या आराखड्यात हा रस्ता घेतला गेला आहे. पण नव्या आराखड्यास अद्याप मंजुरीच मिळालेली नाही. त्यामुळे या स्थितीत महानगरपालिकेने बांधकाम परवानगी देणे चुकीचे ठरले आहे. येत्या सर्वसाधारण सभेत या रस्त्याचा वाद गाजण्याची चिन्हे आहेत.

गणेश बिल्डर स्कीम क्रमांक ३ ही दाट लोकवस्ती आहे. या लोकवस्तीसाठी काही वर्षांपूर्वी आराखड्यात वहिवाटीचा रस्ता दाखवला गेला. नंतरच्या आराखड्यात हा रस्ता गायब झाला होता. पण लोक वहिवाटीचा रस्ता म्हणून ते वापरतच होते. त्यानंतर आता नवा आराखडा तयार झाला. त्यामध्ये हा रस्ता समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे आता नागरिकांना हा वहिवाटीचा हक्काचा रस्ता मिळणे शक्य होणार आहे. पण नव्या आराखड्यास अद्याप सभागृहाकडून मंजुरीच मिळाली नाही. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने बांधकाम परवानगी देणे चुकीचे ठरते. किमान आराखड्यातील नियोजित रस्त्याची जागा सोडून बांधकाम परवानगी देणे गरजेचे होते. ही सर्व प्रक्रिया महानगरपालिकेच्या पातळीवर असताना त्याला राजकीय वादाचा रंग देण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात स्कीम क्रमांक तीन, रुबी नगरपर्यंत सर्वांना वहिवाटीचा रस्ता देण्याचे नियोजन करणे हे महापालिकेचे कर्तव्यच ठरते. पण नेमके महापालिकेने योग्य भूमिका न घेता व वहिवाटीचा रस्ता समजून घेतला नाही. त्यामुळे एकाच दिवसात या सातशे लोकांना रस्त्यापासून अलिप्त करण्यात आले. विशेष म्हणजे यामध्ये नगरसेवक दीपक जमादार वगळता कोणीही लक्ष घातले नाही.

निकालाआधीच रस्ता खोदला
न्यायप्रविष्ट प्रकरणात कोणतीही कारवाई न करता, निकालाची प्रतीक्षा न करता उघडपणे रस्ता खोदण्याच्या प्रकारावरदेखील मोठी चर्चा घडून आली. या वादाला राजकीय रंग न देता नागरिकांना त्यांचा हक्काचा रस्ता तातडीने देण्यासाठी महानगरपालिका किती संवेदनशीलता दाखवते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com