
शिरूर : उसतोडीसाठी आणलेल्या तीन कुटूंबातील पुरूष, महिला कामगारांना आलेगाव पागा (ता. शिरूर) येथे वेठबिगाराप्रमाणे राबवून घेत त्यांचा छळ केला जात होता. त्यांना त्यांच्या गावी देखील जाऊ दिले जात नव्हते. याबाबत वरीष्ठ पातळीवरून सूत्रे हलल्याने स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत या कामगारांसह त्यांची मुले आणि जनावरांची देखील आज मुक्तता केली.