esakal | सरश्रीलिखित चरित्रपर पुस्तकांचे प्रकाशन
sakal

बोलून बातमी शोधा

Book-Publish

सरश्रीलिखित चरित्रपर पुस्तकांचे प्रकाशन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘‘आर्किमिडीजला जेव्हा धातूच्या वस्तुमानाचा शोध लागला, तेव्हा तो देखील एक प्रकारची विश्रांतीच घेत होता. पण त्याचं विचारचक्र सुरू होतं आणि अचानक तो युरेका.. युरेका असं ओरडू लागला. त्याची विश्रांती ही मौलिक होती. मोठमोठ्या साधुसंतांना जेव्हा आत्मसाक्षात्कार घडला, त्या वेळी तेही एका अर्थाने विश्रांतिवस्थेतच होते. म्हणजेच हिणकस आळस हा आपल्याला स्वपासून दूर घेऊन जातो, तर मौलिक विश्रांती ही आपल्याला आत्मबोध घडवू शकते...’’, तेजज्ञान फाउंडेशनचे सरश्री उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगत होते. 

निमित्त होते, ‘सकाळ’ प्रकाशनातर्फे प्रकाशित होणाऱ्या सरश्रीलिखित ‘येशू ख्रिस्त : आत्मबलिदानाचा मसीहा’ आणि ‘रामकृष्ण परमहंस : भक्तीच्या भक्ताचे सुंदर जीवन’ या दोन चरित्रपर पुस्तकांच्या प्रकाशनाचे. भक्त आणि भक्ती या संकल्पना सर्व धर्मांत सारख्याच असतात, याचा प्रत्यय देणाऱ्या या पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच सणसनगर, किरकटवाडी येथील तेजज्ञान फाउंडेशनच्या मनन आश्रमात सरश्री यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी ‘आळसावर मात करण्याची युक्ती’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सरश्री म्हणाले, ‘‘ज्ञानदेखील सत्पात्री असायला हवं, अन्यथा त्याचा दुरुपयोग होण्याची शक्‍यता असते. तसेच योग्य ज्ञानाअभावी मनुष्य अकार्यक्षम होऊन सबबी सांगू लागतो. खरेतर कर्म हेच कर्मफळ असून वर्तमानात जगणे हीच मनुष्याची बहुमूल्य प्राप्ती आहे. प्रत्येकाने आपले कर्म प्रामाणिकपणे व सद्‌भावाने करायला हवे.’’ तेजविद्या यांनी प्रास्ताविक केले. ‘सकाळ प्रकाशना’चे आशुतोष रामगीर या वेळी उपस्थित होते.

loading image
go to top