‘सेव्हन मंत्रा’च्या भाजीपाल्यासाठी आज साडेअकरापर्यंत करा बुकिंग

Seven-Mantra
Seven-Mantra

पुणे - कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी (ता. १३) मध्यरात्रीपासून कडक लॉकडाउन होणार आहे. त्यामुळे ‘ॲग्रोवन’ आणि ‘सेव्हन मंत्रा’च्या वतीने सोमवारी भाजीपाला-फळांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत बुकिंग करण्याची सोय केली आहे.

लॉकडाउनच्या काळात दूध आणि औषधांशिवाय कोणत्याही गोष्टी खरेदी करता येणार नाहीत. त्यामुळे नागरिकांना ताज्या भाज्या, फळे उपलब्ध करून देण्यासाठी ‘ॲग्रोवन’ आणि ‘सेव्हन मंत्रा’ सरसावला आहे. या उपक्रमात मंगळवारी भाजीपाला-फळे वितरित केली जातात; पण लॉकडाउनमुळे सोमवारी दुपारपर्यंत सर्व माल घरपोच देण्याची विशेष व्यवस्था केली आहे. रविवारी वितरित करण्यात येणाऱ्या मालासाठीचे बुकिंग ‘फुल्ल’ झाले आहे. सोमवारी वितरित करण्यात येणाऱ्या मालासाठी रविवारी दुपारी एक वाजेपर्यंत बुकिंग स्वीकारणार आहे. त्या बुकिंगसाठीही मोठ्या प्रमाणावर मागणी आली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकत्रित भाज्या देण्याची संकल्पना खूप आवडली. त्यामुळे ही योजना सुरू झाल्यापासून मी भाजीपाला-फळे घेत आहे. लॉकडाउनच्या काळात याचा अधिक उपयोग होईल.
- सुरेखा ढाकरे (मोरवाडी, पिंपरी-चिंचवड) 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षित आणि दर्जेदार भाजीपाला मिळण्याची सोय झाली आहे. लॉकडाउनच्या काळात भाजीपाल्याचे काय?, ही आमची चिंता मिटली आहे. दर्जाबाबत प्रश्‍नच नाही. 
- डॉ. अर्चना गोरे (दिघी) 

भाजीपाला-फळे बॉक्‍समध्ये येतात. पॅकिंग उत्तम आहे. भाज्यांची व्हरायटी आहे. त्यामुळे भाज्यांचा प्रश्‍न आता मिटला आहे. 
- वसुधा कुलकर्णी (पॉप्युलरनगर, वारजे) 

दोन महिन्यांपासून फळे व भाजीपाला घेत आहे. ही सेवा अत्यंत दर्जेदार आहे. ताजा व स्वच्छ माल असल्याने आमची चांगली सोय झाली आहे. 
- मानसी कुलकर्णी (सातारा रोड) 

शेतातून आलेली ताजी भाजी-फळं छान पॅक करून घरपोच मिळतात. त्यामुळे भाजीपाल्याची खात्री आणि सुरक्षा मिळाली आहे.
- संध्या देशपांडे (कोथरूड) 

कोरोनाच्या काळात ताजा भाजीपाला तो ही थेट शेतातून मिळतो. घरपोच स्वच्छ आणि चांगला भाजीपाला मिळत असल्याने गर्दीत जाऊन सर्वांनी हाताळलेला भाजीपाला घेण्याची गरज उरली नाही.
- उज्ज्वला पवार (विश्रांतवाडी)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com