Pune Crime: बोपदेव घाट लैंगिक अत्याचार प्रकरण! पुणे ग्रामीण पोलिसांनी मुख्य आरोपीला घेतलं ताब्यात
आरोपी गोसावी याने बोपदेव घाटात आपल्या मित्रासमवेत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केला होता. पुणे ग्रामीण पोलिस तपासासाठी आरोपीचा ताबा पुणे शहर पोलिसांकडे देणार असल्याची माहिती आहे.
Pune Latest News: पुण्यातल्या बोपदेव घाट लैंगिक अत्याचार प्रकरणी तिसऱ्या फरार आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तरुणीवर लैंगिक सामूहिक करणाऱ्या मुख्य आरोपीला पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वालचंद नगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.