Pune Traffic News : बोपोडीतील वाहतूक समस्या मार्गी लागणार

बोपोडीतील रस्त्यावर अर्धवट कामे झाली असून, अनेकदा अपघात होत आहेत. परंतु या चौकातील वाहतुकीची समस्या येत्या आठवडाभरात मार्गी लागेल, अशी ग्वाही आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.
Bopodi traffic woes residents to get respite as PMC to widen road
Bopodi traffic woes residents to get respite as PMC to widen roadSakal

औंध : बोपोडीतील रस्त्यावर अर्धवट कामे झाली असून, अनेकदा अपघात होत आहेत. परंतु या चौकातील वाहतुकीची समस्या येत्या आठवडाभरात मार्गी लागेल, अशी ग्वाही आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पथविभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर, पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या समवेत आमदार शिरोळे यांनी चौकातील वाहतुकीची पाहणी केली. या वेळी त्यांनी ही माहिती दिली.

यासंदर्भात बुधवारी (ता. ६) अधिकाऱ्यांसोबत व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांची बैठक घेण्यात येणार असल्याचेही आमदार शिरोळे यांनी सांगितले. बोपोडी चौकात रस्त्याची कामे अर्धवट असून बऱ्याचदा याठिकाणी अपघात होत आहेत.

तसेच हॉस्पिटलकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडतानाही अडथळे येत आहेत. यावर सविस्तर चर्चा झाली. बुधवारपर्यंत बोपोडी चौकातून डाव्या बाजूकडे हॅरिस पुलाकडे जाणारा रस्ता पूर्ण होईल. त्याचबरोबर त्याठिकाणी असलेला सिग्नल बुधवारपर्यंत हलविला जाईल.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील जयहिंद टॉकीजच्या पुढच्या टप्प्याच्या रस्त्याचे काम १० तारखेपर्यंत पूर्ण होईल. त्याठिकाणी दुहेरी वाहतूक तातडीने सुरू करावी. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर दुहेरी वाहतूक सुरू करावी आणि खडकीवासीयांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी पाहणीच्या वेळी केली.

या वेळी माजी नगरसेवक प्रकाश ढोरे, आनंद छाजेड, सुनीता वाडेकर, दुर्योधन भापकर, संगीता गवळी, धर्मेश शहा, कार्तिकी हिवरकर, नेहा गोरे, मनीषा कांबळे, अजित पवार, अनिल भिसे, विजय ढोणे, शांतिलाल शेठ, हेमंत शहा, अनिरुद्ध वाकीकर, अनिकेत भिसे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com