नव्या स्ट्रेन विरुद्ध दोन्ही लशी कार्यक्षम; शास्त्रज्ञांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्रासह देशभरात कोरोना विषाणूचा मोठा उद्रेक झाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ब्रिटन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका यांसह ‘बी.१.६१७’ नावाचा भारतीय म्युटेशनही आढळते.
co vaccine
co vaccine

पुणे - महाराष्ट्रासह देशभरात कोरोना विषाणूचा मोठा उद्रेक झाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ब्रिटन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका यांसह ‘बी.१.६१७’ नावाचा भारतीय म्युटेशनही आढळते. डबल किंवा ट्रीपल म्युटेशन नावाने परिचित या सर्व स्ट्रेन विरुद्ध कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशी प्रभावी ठरत आहेत, असा विश्वास देशातील आघाडीच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला. त्याचबरोबर मास्क, शारीरिक अंतर आणि वेळोवेळी हात धुणे या (एसएमएस) त्रिसुत्रीसह लसीकरण हेच कोरोनाविरुद्ध लढण्याचे प्रभावी शस्त्र असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि जैवतंत्रज्ञान विभागाच्यावतीने (डीबीटी) ‘सार्स कोविड -२ विषाणूची जनुकीय शृंखला’ या विषयावर वेबिनारचे आयोजन केले होते. यावेळी औद्योगिक आणि वैज्ञानिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. शेखर मांडे, जीनोमिक्स आणि इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल, डीबीटीच्या सचिव डॉ. रेणू स्वरूप, राजेश भूषण, डॉ. सुजीत सिंग, डॉ. सुधांशु व्रती, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) संचालक डॉ. प्रिया अब्राहम आदी उपस्थित होते. नव्याने येणाऱ्या कोविड स्ट्रेनची जनुकीय शृंखला निश्चित करणे, तसेच त्याचा उपचार आणि कोरोना रोखण्यासाठी होणारा उपयोग शास्त्रज्ञांनी विविध सत्रांच्या माध्यमातून स्पष्ट केला. त्यांनी सांगितले, की महाराष्ट्रात प्रामुख्याने बी.१.६१७ हा स्ट्रेन मोठ्या प्रमाणावर आढळतो. त्यालाच आपण भारतीय म्यूटेशन म्हणतो. कोणत्याही विषाणूचा म्यूटेट होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. सध्याच्या म्युटेशनमुळे आपल्या शरीरातील प्रतिपींडे कोरोना विषाणूच्या रिसेप्टर बायंडीग डोमेनला शोधू शकत नाही. मात्र, विषाणू मानवी पेशीवरील एसीई-२ या संग्रहकाला बरोबर शोधतो. त्यामुळे संसर्ग होत आहे.

co vaccine
पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण निगवेकर यांचे निधन

आरटी-पीसीआर टेस्ट अचूकच

नव्या स्ट्रेनमुळे आरटी-पीसीआर टेस्टचे रिपोर्ट फाल्स निगेटीव्ह म्हणजेच चुकीचे येत असल्याची चर्चा सध्या आहे. मात्र, आरटीपीसीआर निदान चाचणी पूर्णतः अचूक आहे. कारण निदानासाठी वापरण्यात येणारी सर्व आम्ले हे सर्व प्रकारच्या नव्या म्युटेशनला शोधण्यास सक्षम असल्याचे सिद्ध झाले. निदान चाचणी चुकीचे येण्यामागे नमुना घेतानाची चूक, रुग्णाने चाचणीसाठी केलेला उशीर किंवा इतर मानवी चुका असू शकतात, असे स्पष्टीकरण डॉ. अब्राहम यांनी दिले.

महत्त्वाचे निष्कर्ष -

  • विषाणूमध्ये सातत्याने म्यूटेशन होत असतात

  • देशात वेगवेगळ्या भागात वेगवेगळे स्ट्रेन आढळतात

  • जो देश स्ट्रेन शोधतो, त्या देशाचे नाव त्या स्ट्रेनला दिले जाते

  • कोरोना प्रसार केवळ नव्या स्ट्रेनमुळे वाढत नाही. तर प्रसार रोखण्यासाठी घातलेल्या नियम नागरिकांनी तोडले तर प्रसार वाढतो

  • लसीकरणानंतर रुग्ण अत्यवस्थ होण्याचे प्रमाण अल्प

‘बी. जे.’ ने शोधला भारतीय म्यूटंट

पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील संशोधकांनी अकोला आणि अमरावती येथील नमुन्यांच्या आधारे सर्वात प्रथम ‘बी.१.६१७’ हा भारतीय म्यूटंट शोधला होता. त्या आधारे पुढली जनुकीय श्रुंखलेची पुष्टी करण्यात आली, अशी माहिती डॉ. सिंग यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com