

Blood That Connects Lives: Pune Donors Set an Example of Selfless Service
sakal
पुणे: ‘‘चाळीस वर्षांपूर्वी आयुष्यात पहिले रक्तदान केले. गर्भवती असलेल्या मित्राच्या बहिणीला रक्ताची गरज होती. त्यावेळी रक्तदानाची संस्कृती नसल्याने तुटवडा होता. माझे नुकतेच १८ वर्षे पूर्ण होत आले होते. अन् मी रक्तदान केले. त्यानंतर मित्रासह कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर माझ्याविषयी आनंद व समाधानाची भावना पाहिली, त्याने आयुष्यभरासाठी रक्तदानाची प्रेरणा दिली. आतापर्यंत मी १६२ वेळा रक्तदान व प्लेटलेट दान केले आहे,’’ ५८ वर्षीय कपड्यांचे व्यावसायिक व रक्तदाते गिरीश लाहोटी सांगत होते.