विशेष बाब म्हणून सोसायट्यांभोवती बांधणार सीमाभिंती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 November 2019

पुणे : पुरात कोसळलेल्या खासगी सोसायट्यांच्या सीमाभिंतीसाठी विशेष बाब म्हणून आर्थिक तरतूद करण्याचे नियोजन महापालिका करीत आहे. पुरस्थितीमुळे आंबिल ओढा, सहकारनगर, अरण्येश्‍वर, कात्रज, धनकवडी, दांडेकर पुलासही भागातील जलवाहिन्या आणि ड्रेनेजलाइन खराब झाल्या आहेत.

पूर ओसरल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात कामे करण्यात आली आहे. तरीही पाणीपुरवठा विस्कळीत होण्यासोबत सांडपाणी रस्त्यावर येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याशिवाय, अनेक सोसायट्यांलगतच्या पडलेल्या सीमाभिंती बांधण्याचे धोरण नसल्याने त्यावरही महापालिकेने निर्णय घेतला नाही. या भिंती बांधून देण्याची मागणी करीत लोक महापालिकेत चकरा मारत आहे. पूरग्रस्तांच्या मागण्यासंदर्भात आमदार माधुरी मिसाळ प्रभारी महापालिका आयुक्त रुबल अगरवाल यांची भेट घेतली. त्यादरम्यान, काही खातेप्रमुखांची बैठक घेऊन नुकसान आणि परिणाम याचा आढावा घेण्यात आला. 

मिसाळ म्हणाल्या, "जलवाहिन्या आणि ड्रेनेजलाइनची कामे झाली नसल्याने रहिवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ती प्राधान्याने करण्याचा निर्णय झाला आहे. आंबिल ओढ्यालगत सुरक्षिततेच्या उपाययोजनांसाठी तातडीने निविदा काढून पुढील तीन आठवड्यात प्रत्यक्ष काम सुरू होईल. ''

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boundaries will be built around societies As a special case by PMC Pune