Pune News : प्लस व्‍हॅलीत वाहून गेलेल्‍या बॉक्सिंगपटूचा मृत्यू;वर्षाविहारात पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

मुळशी तालुक्‍यातील ताम्हिणी घाट परिसरातील निवे (ता. मुळशी) येथील प्लस व्‍हॅलीत वाहून गेलेल्‍या स्‍वप्नील धावडे यांचा मृतदेह अखेर तिसऱ्या दिवशी सोमवारी (ता. १) दुपारी आढळून आला.
Pune News
Pune News sakal
Updated on

माले : मुळशी तालुक्‍यातील ताम्हिणी घाट परिसरातील निवे (ता. मुळशी) येथील प्लस व्‍हॅलीत वाहून गेलेल्‍या स्‍वप्नील धावडे यांचा मृतदेह अखेर तिसऱ्या दिवशी सोमवारी (ता. १) दुपारी आढळून आला. धावडे हे सैन्‍य दलातून निवृत्त झाले होते. ते बॉक्सिंगचे राष्ट्रीय खेळाडू होते. या बॉक्सिंगपटूच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पावसाळ्यात पर्यटकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

स्‍वप्नील धावडे (वय ३८, रा. भोसरी, पिंपरी-चिंचवड) असे मृत बॉक्सिंगपटूचे नाव आहे. पिंपरी चिंचवड पोलिस दलातील शूटिंगच्या राष्ट्रीय खेळाडू रश्मी धावडे यांचे ते पती होत. शनिवारी (ता. २९) दुपारी स्‍वप्नील व जिममधील ३२ मित्र प्‍प्लस व्‍हॅली परिसरात पर्यटनासाठी आले होते. स्‍वप्नील यांनी प्‍प्लस व्‍हॅलीच्‍या पाण्‍याच्‍या कुंडात पोहण्‍यासाठी उडी मारली. परंतु पाण्‍याच्‍या जोराच्‍या प्रवाहामुळे पहिल्‍या कुंडातून वाहून ते खालील बाजूच्या पन्‍नास फूट खाली असलेल्‍या दुसऱ्या कुंडात पडले.

कुंडात पडले. तेव्‍हापासून त्‍यांचा शोध सुरू होता. सलग तीन दिवस शोधकार्य केल्‍यानंतर आज तिसऱ्या दिवशी सोमवारी दुसऱ्या कुंडातील पाणी वाढल्‍याने पाण्‍याचा प्रवाह वाढला. खाली रायगड जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्‍या देवकुंड धबधब्‍याच्‍या परिसरात स्वप्नील यांचा मृतदेह माणगाव आपत्ती व्‍यवस्‍थापन, शेलार मामा रेस्क्यू टीम यांना आढळून आला.

जोराचा पाऊस, निसरडे वातावरण या परिस्थितीत सलग तीन दिवस पौड पोलिस, माणगाव आपत्ती व्‍यवस्‍थापन, शेलार मामा रेस्क्यू टीम, ताम्हिणी वनविभाग, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती संस्था, शिवदुर्ग टीम लोणावळा, मित्रपरिवार यांनी प्‍प्लस व्‍हॅली, देवकुंड धबधबा, जंगल परिसरात अत्‍यंत कठीण परिस्थितीत शोधकार्य केले. अथक प्रयत्नांनंतर तिसऱ्या दिवशी स्‍वप्नीलचा मृतदेह आढळून आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.