''खऱ्या प्रेमाचा शेवट कधी गोड नसतो कारण...'', अशी पोस्ट करत 'त्याने' मारली नदीत उडी

 A boy Committed suicide  by jumping into indrayani river in pune
A boy Committed suicide by jumping into indrayani river in pune
Updated on

पुणे : ''खऱ्या प्रेमाचा शेवट कधी गोड नसतो कारण खर प्रेम कधी संपत नाही'' अशी पोस्ट सोशल मिडियावर शेअर करत एका तरुणाने इंद्रायणीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

सांगुर्डी (ता. खेड) येथील समीर एकनाथ भसे (वय 22) या तरुणाने इंदोरीतील इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली. रविवारी (ता. 22) सकाळी ब्रिटिशकालीन जुन्या पुलावर स्मशानभूमीजवळ ही घटना घडली. शिवदुर्ग मित्र, लोणावळा रेस्क्‍यू टीम आणि एनडीआरएफ पथकाने सायंकाळी पाचच्या दरम्यान मृतदेह शोधून काढला. याप्रकरणी अभिलाष कालिदास चव्हाण (वय 26, इंदोरी) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात माहिती दिली. 

नदीत उडी मारण्यापुर्वी समीरने आपल्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर वाढदिवसाचा केक, चॉकलेट आणि अंगठीचे फोटोही पोस्ट केले आहेत. यावरून समीर याने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास समीर दुचाकीवरून इंद्रायणी नदीच्या पुलावर उभा होता.  उडी मारण्याआधी तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता. त्यानंतर क्षणार्धात त्याने पुलावरून थेट नदीत उडी मारली. नदीतील काही मच्छीमार हे पाहून आरडाओरडा केला. पण, समीर तोपर्यंत पाण्यात दिसेनासा झाला. 

याप्रकरणी अभिलाष कालिदास चव्हाण (वय 26, इंदोरी) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनतर  एनडीआरएफच्या पथकाने तब्बल सहा तास समीरचा इंद्रायणी नदीत शोध घेतला. अथक प्रयत्नानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास समीरचा मृतदेह एनडीआरएफच्या हाती लागला.  

पुणे : आईला मोबाईलवरून 'बाय बाय' म्हणत विवाहितेने केली आत्महत्या

समीरने नदीत उडी मारण्यापूर्वी लिहलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली. या चिठ्ठीत त्याने, समीर एकनाथ भसे मी आत्महत्या करत आहे. यास कोणीही जबाबदार नाही. मी माझ्या मर्जीने आणि स्व:इच्छेने जीवन संपवत आहे. कोणाला जबाबदार धरू नये. मला जीवन संपविण्यासाठी कुणीही प्रवृत्त केले नाही. मी स्वतः हा निर्णय घेतला आहे. ''नाना मम्मी मला माफ करा, मी तुम्हाला सोडून चाललोय, असे समीरने चिठ्ठीत लिहिले आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com