Social Viral:उकळत्या पाण्यात बसला मुलगा; फेसबुकवर फसवेगिरीचा भांडाफोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

boy sits in boiling water social media viral video explanation

फेसबुकवर शहाजी भोसले नामक एका युजरने उकळत्या पाण्यात ध्यानस्थ बसलेल्या मुलाचा व्हिडिओ शेअर केलाय. मुळात सोशल मीडियावर शेअर होणारा हा व्हिडिओ कुठं शूट करण्यात आलाय. याची मात्र माहिती कोणालाही नाही.

Social Viral:उकळत्या पाण्यात बसला मुलगा; फेसबुकवर फसवेगिरीचा भांडाफोड

पुणे : सोशल मीडियावर कधी काय शेअर होईल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर कढईत उकळत्या पाण्यात ध्यानस्थ बसलेल्या मुलाचा व्हिडिओ शेअर होतोय. जणू चमत्कार असल्यासारखं त्याच्या भोवती भाविकांचा गराडा आहे. या प्रकाराची पोलखोल करणारी एक पोस्ट सध्या फेसबुकवर शेअर होताना दिसत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फेसबुकवर अंधश्रद्धा निर्मुलन समिताचे महाराष्ट्र सरचिटणीस शहाजी भोसले यांनी उकळत्या पाण्यात ध्यानस्थ बसलेल्या मुलाचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केलाय. मुळात सोशल मीडियावर शेअर होणारा हा व्हिडिओ कुठं शूट करण्यात आलाय. याची मात्र माहिती कोणालाही नाही. पण, अशी फसवणूक कोणाचीही होऊ शकते. त्यामुळं प्रत्येकजण दुसऱ्याला जागरूक करू लागलाय. भोसले यांनी व्हिडिओ शेअर करताना त्याच्याबरोबरच मराठीत या प्रकाराचं स्पष्टीकरण देणारी पोस्टही शेअर केलीय. दोन स्वतंत्र कढईच्या माध्यमातून ही फसवेगिरी होते, असं शहाजी भोसले यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय. मुलगा बसलेली कढई आणि धग असलेली कढई यांच्यात थोडा गॅप असतो. बसलेल्या कढईत पाण्याला उकळताना येतात तसे बुडबुडे आणण्यासाठी हवेची एक पाईप जोडलेली असते. पाण्यात फुलं टाकलेली असतात त्या फुलांच्या गर्दीत ती पाईप दिसत नाही. पाणी उकळत असल्याचं दिसत असल्यामुळं कोणी त्यात हात घालून बघत नाही आणि हवेचे बुडबुडे आलेल्या पाण्याला उकळी येत असल्याचं सगळे मान्य करतात.

आणखी बातमी वाचा - 'चमट्टा बिरयानी वही बेचेगा' कोम आहे चमट्टा?

नेटकऱ्यांनी मानले आभार
शहाजी भोसले यांनी आकृतीसह या फसवेगिरीचा भांडाफोड केल्यामुळं फेसबुकवर अनेकांनी त्यांचे आभार मानले आहेत. अनेकांनी हा प्रयोग कुठं करण्यात आलाय, याची माहिती विचारली आहे. काहींचा अशा प्रकारावर विश्वास असल्याचं दिसत आहे. त्यामुळं त्यांनी शहाजी भोसले यांच्या स्पष्टीकरणाला आक्षेप घेतलाय. 

टॅग्स :Share Market