'चमट्टा बिरयानी वहीं बेचेगा'; कोण आहे हा चमट्टा? ट्विटरवर आला ट्रेंड

टीम ई-सकाळ
रविवार, 15 डिसेंबर 2019

लोकेश हा आपल्या हातगाडीवर बिर्याणी विक्रीचं काम करत होता. पण, गावातील एका टोळक्याने त्याला जात विचारून मारहाण करण्यास सुरुवात केली.

नवी दिल्ली :  उत्तर प्रदेशात ग्रेटर नोएडा जवळील गौतम बुद्ध नगर येथे एका दलित बिर्याणी विक्रेत्याला मारहाण करून, त्याचा बिर्याणी स्टॉल उद्धवस्त केल्याचा प्रकार घडलाय. केवळ बिर्याणी विक्रेता दलित आहे म्हणून, एका टोळक्यानं त्याला शिविगाळ करत, मारहाण केली. लोकेश चमट्टा, असं त्या बिर्याणी विकेत्याचं नाव असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर नेटिझन्सनी मोहीम उघडली आहे. त्यामुळं ट्विटरवर आज, #चमट्टा_बिरयानी_वहीं_बेचेगा असा हॅशटॅग सुरू करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय घडले?
या संदर्भात इंडिया टुडेनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटलंय की, लोकेश हा आपल्या हातगाडीवर बिर्याणी विक्रीचं काम करत होता. पण, गावातील एका टोळक्याने त्याला जात विचारून मारहाण करण्यास सुरुवात केली. तू दलित असून, बिर्याणी कसा विकू शकतोस? अशी विचारणा करत, लोकेशला जातीवाचक शिवीगाळ सुरू केली. पुन्हा येथे दिसलास तर गोळ्या घालू, अशी धमकीही त्यांनी लोकेशला दिलीय. त्यावेळचा एक व्हिडिओही शूट करण्यात आला असून, एएनआय वृत्तसंस्थेनं तोप्रसिद्धही केलाय. या संदर्भात लोकेशनं पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. 

आणखी वाचा - कॅब विरोधातील आंदोलनाला दिल्लीत हिंसक वळण

नेटिझन्सचा पुढाकार
नेटिझन्सनी लोकेशला पाठिंबा देत त्याचा एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात त्यानं घडलेला सगळा प्रसंग सांगितलाय. त्या व्हिडिओनंतर तर, ट्विटरवर #चमट्टा_बिरयानी_वहीं_बेचेगा हा हॅशटॅग जोरात सुरू झाला. अनेकांनी चमट्टाच्या समर्थनार्थ बिर्याणीचे फोटो शेअर केले असून, चमट्टाच्यासोबत असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी व्हिडिओवरून तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dalit man beaten for biryani selling in greater noida