esakal | Elgar Parishad : सर्व बाबी तपासूनच परवानगी द्यावी : ब्राह्मण महासंघ
sakal

बोलून बातमी शोधा

Brahmin Mahasangh Said  Elgar Parishad should be allowed only after checking all matters

तीन वर्षापुर्वी पुण्यातील शनिवारवाड्यावर एल्गार परिषद झाली होती. ती पुढे वादग्रस्त ठरली होती. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उफाळलेला होता. या परिषदेचा संबध पोलिसांनी त्या हिसांचाराशी जोडला होता.  

Elgar Parishad : सर्व बाबी तपासूनच परवानगी द्यावी : ब्राह्मण महासंघ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : एल्गार परिषदेचा विषय पुन्हा एकदा चर्चेत येत आहे. ३१ डिसेंबरला पुण्यात एल्गार परिषद आयोजित करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली जात आहे. निवृत्त न्यायाधीश बीजी कोळसे पाटील पुणे पोलिसांकडे अशी मागणी केली आहे.

दरम्यान ''एल्गारला सर्वांगीण अभ्यास करूनच परवानगी द्यावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे. आनंद दवे यांनी याबाबत 'सकाळ'शी बातचित केली. ''पुन्हा एकदा एल्गार परिषदेची तयारी होत असल्याचे समजले आहे. अशा वेळेस शासनाने सर्व बाबी तपासूनच त्यास परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तीन वर्षापुर्वी पुण्यातील शनिवारवाड्यावर एल्गार परिषद झाली होती. ती पुढे वादग्रस्त ठरली होती. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उफाळलेला होता. या परिषदेचा संबध पोलिसांनी त्या हिसांचाराशी जोडला होता.  दोन्ही बाजुकडून आरोप प्रत्यारोप झाले होते.  एल्गार परिषदेचा आणि कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराचा संबध नाही असा दावा करण्यात आला होता. त्यानंतर पुढील दोन वर्ष एल्गार परिषद झाली नाही. दरम्यान आता सरकार बदलल्यानंतर पुन्हा एल्गार परिषद व्हावी अशी मागणी बीजी कोळसे पाटील यांनी केली आहे.

याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की, ''पहिल्या एल्गार परिषदेची जेव्हा जाहिरात केली जात होती, तेव्हा भित्तीपत्रके, बॅनर लावले जात होते. त्यावरील मजकूर वाचून त्यातून जातीय भावना दुखावल्या जाण्याची भीती आम्ही व्यक्त केली होती आणि त्यास परवानगी देऊ नये, अशी विनंती आम्ही शासनाकडे त्या वेळेस केली होती. पुन्हा एकदा एल्गार परिषदेची तयारी होत असल्याचे समजते आहे. आयोजक, वक्ते, विचार हे सर्व जर तेच असतील तर पुन्हा त्या व्यासपीठावरून त्याच त्याच भूमिका मांडल्या जाण्याची शक्यता जास्त आहे. अशा वेळेस शासनाने सर्व बाबी तपासूनच त्यास परवानगी द्यावी.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

''भाषणास चौकट घालून बंदिस्त करता येत नाही, बोलणारा बोलून जातो आणि रेकॉर्डिंग मागवले आहे, चौकशी करू हे सरकारी उत्तर ठरलेले असते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सभेचा अधिकार मान्य करून प्रशासनाने सर्वागीण विचार करूनच परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

शहीद जवान सुजित किर्दत, नागनाथ लोभे यांना पुणे विमानतळावर लष्कराकडून सलामी

loading image
go to top