अतुल ट्युटोरिअल्स : प्रवेश परीक्षांसाठी उत्कृष्ट प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

साधारणपणे दहावीला राज्यातून लाखो विद्यार्थी बसतात. त्यामधील अनेक मुले Olympiad, KVPY, NTSE Scholarship, IIT-JEE, NEET, MH-CET अशा विविध प्रवेशपरीक्षांसाठी प्रशिक्षण घेतात. अतुल ट्युटोरिअल्स गेल्या सात वर्षांपासून विद्यार्थ्यांना अशा विविध प्रवेशपरीक्षांच्या तयारीसाठी प्रशिक्षण देत आहे.

साधारणपणे दहावीला राज्यातून लाखो विद्यार्थी बसतात. त्यामधील अनेक मुले Olympiad, KVPY, NTSE Scholarship, IIT-JEE, NEET, MH-CET अशा विविध प्रवेशपरीक्षांसाठी प्रशिक्षण घेतात. अतुल ट्युटोरिअल्स गेल्या सात वर्षांपासून विद्यार्थ्यांना अशा विविध प्रवेशपरीक्षांच्या तयारीसाठी प्रशिक्षण देत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पालकांनी राहावे निर्धास्त -
शाळेतील विद्यार्थी असो किंवा ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी असोत, या सर्व विद्यार्थ्यांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रशिक्षणाची आवश्‍यकता असते. अशा परिस्थितीत, कोणता क्‍लास चांगला? कोणाचे रिझल्ट चांगले? असे अनेक प्रश्‍न पालकांच्या मनात येत असतात. त्याचक्षणी, अतुल ट्युटोरिअल्स या प्रशिक्षण संस्थेचे नाव प्रकर्षाने समोर येते. उत्कृष्ट प्रशिक्षण, चांगले शैक्षणिक वातावरण यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शैक्षणिक नकाशावर अतुल ट्युटोरिअल्सने कायमच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अतुल ट्युटोरिअल्सच्या कोथरूड, औंध पुणे व पिंपळेगुरव याठिकाणी शाखा आहेत.

उद्याचे शास्त्रज्ञ घडविण्यासाठी अगदी लहान वयातच मुलांमध्ये चिकित्सक वृत्ती, कल्पकता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा असा आमचा प्रयत्न आहे. त्याअनुषंगाने विविध प्रयोगांद्वारे विषय समजून देणे व विद्यार्थ्यांनी  स्पर्धा  परिक्षांबरोबर, शिक्षण आणि करिअरची सांगड घालायला शिकावे यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत.

शैक्षणिक वर्षातील वर्ग -
१) ८ वी, ९ वी, १० वी - CBSE, ICSE, State Board
२) IIT foundation, Olympiad, NTSE स्कॉलरशिप 
३) ११वी, १२ वी आणि JEE Mains
४) ११वी, १२ वी आणि NEET
५) ११वी, १२ वी आणि MHCET, KVPY

वरील नोंदविलेले सर्व वर्ग व प्रवेश परीक्षांसाठी अतुल ट्युटोरिअल्समध्ये उत्कृष्ट प्रशिक्षण दिले जाते. संस्थेमध्ये उच्चशिक्षित व नामांकित असे २५ पेक्षा जास्त शिक्षक कार्यरत आहे. संस्थेचे संचालक प्रा. अतुल मोरे, संचालिका रीना मोरे व डॉ. सुशील बेनके (IISER) हे Competitive Exam Division प्रमुख आहेत. नानाविध विषयात पारंगत शिक्षक वर्ग मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अविरत परिश्रम करतात. 

अतुल ट्युटोरिअल्सचे ऑनलाइन कोर्सेस ७ वी पासून १२ वी पर्यंत सर्व बोर्डासाठी सुरू झाले आहेत. विविध प्रवेशपरीक्षांसाठी तयारी आणि शिक्षणातील संभाव्य बदल या सर्वांच्या माहितीसाठी १ जुलै २०२० रोजी नामांकित व तज्ञ वक्ते विवेक वेलणकर फेसबुक लाइव्ह च्या मदतीने आपल्या भेटीस येणार आहेत. 
तरी सर्व विद्यार्थी व पालक यांनी या विनामूल्य करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात जरूर सहभागी व्हावे. 
COVID १९ नंतरचे शिक्षण विषयी ते बोलणार आहेत. आपण या वेबिनारसाठी ८८८८५७७७७६ वर फोन करून विनामूल्य 
नावनोंदणी करू शकता किंवा त्यासाठी www.atultutorials.com ला भेट द्या.

अधिक माहितीसाठी :  www.facebook.com/AtulTutorials


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brands of Pune Atul Tutorials Excellent training for entrance exams