esakal | Bana Envirotech Pvt. ltd : पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी ‘ड्रिंक वॉटर डेली’ ॲप
sakal

बोलून बातमी शोधा

Bana-Envirotech-Pvt.-ltd.

ड्रिंक वॉटर डेली हे अनोखे ॲप पिण्याच्या पाण्यासंदर्भात एक अभिनव संकल्पना घेऊन आले आहे! तुम्हाला आता घरामध्ये पाण्याची भांडी साठवून ठेवण्याची गरज नाही! आमच्या ॲपवर जा, ऑर्डर करा आणि पाणी तुमच्या दारात पोहचेल! ऑर्डर दिल्यानंतर ग्राहकांना २० लीटर पॅकिंग केलेले शुद्ध पाणी कमीत कमी वेळेत मिळेल. कंपनीने नुकतीच सबस्क्रिप्शन सुरू केली आहे.

Bana Envirotech Pvt. ltd : पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी ‘ड्रिंक वॉटर डेली’ ॲप

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

ड्रिंक वॉटर डेली हे अनोखे ॲप पिण्याच्या पाण्यासंदर्भात एक अभिनव संकल्पना घेऊन आले आहे! तुम्हाला आता घरामध्ये पाण्याची भांडी साठवून ठेवण्याची गरज नाही! आमच्या ॲपवर जा, ऑर्डर करा आणि पाणी तुमच्या दारात पोहचेल! ऑर्डर दिल्यानंतर ग्राहकांना २० लीटर पॅकिंग केलेले शुद्ध पाणी कमीत कमी वेळेत मिळेल. कंपनीने नुकतीच सबस्क्रिप्शन सुरू केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उत्पादनाची विश्वासार्हता राखणे आणि पॅकिंग केलेले २० लीटर पिण्याचे पाणी वेळेवर वितरित करणे, हे मोठे आव्हान आहे. २० लीटर पाण्याचा जार पिण्याच्या पाण्याच्या बाजारपेठेवर राज्य करीत आहे. मात्र, वितरित केलेल्या पाण्याची गुणवत्ता किंवा स्रोत याबद्दल ग्राहकांना खात्री नसते. मॅन्युफॅक्चरिंग युनिटशी संलग्न असलेल्या डिलर्सद्वारे मार्केट सर्व्हिस दिली जाते आणि नंतर ते उत्पादन ग्राहकांना वितरित केले जाते. बऱ्याच वेळा ग्राहकाला उत्पादन वितरणासाठी वेळखाऊ डिलर्सवर अवलंबून राहावे लागते. म्हणून ग्राहक त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी २० लीटर जार साठवतात. हे जार कार्यालयाच्या आवारात अनावश्यक जागा (रिकामी आणि भरलेली जार) व्यापत आहेत व हा अनावश्यक त्रास आहे.

प्लॅस्टिकच्या भांड्यात पाणी साठवल्याने जागा व पैशांच्या अपव्ययाबरोबरच आरोग्याचे प्रश्नही निर्माण होतात. पाण्याची भांडी नेहमीच थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवली जात नाहीत. प्लॅस्टिकच्या जारमध्ये  अनेक दिवस पाणी साठवून ठेवल्यास त्यामध्ये हानिकारक रसायने तयार होतात. अशावेळी 'ड्रिंक वॉटर डेली' कामाला येते, कारण ते ताजे पॅक केलेले पाणी तुम्हाला हव्या त्या वेळेस पुरवते.

आम्ही ग्राहकांना आवश्यकतेनुसार बीआयएस आणि एफएसएसएआय प्रमाणित शुद्ध पिण्याचे पाणी देऊन या पिण्याच्या पाण्याच्या दैनंदिन समस्येचे निराकरण करतो. आमचे जारही उच्च औद्योगिक मानांकांचे आहेत. पाण्याचे वितरण अॅपच्या माध्यामातून होत असले, तरी तुम्हाला त्याचा मूळ स्रोत शोधता येतो. डिलिव्हरी असोसिएटचा मागोवा सॉफ्टवेअरद्वारे घेतला जात असल्याने आमची डिलिव्हरी सर्व्हिस फूल-प्रूफ आहे. ग्राहकांना डिलिव्हरीबाबतचे संदेशही पाठवले जातात. आमचे सॉफ्टवेअर नियुक्त केलेल्या सहयोगीद्वारेच जार वितरित केले जात आहेत ना, यावर लक्ष ठेवते.

आपण दररोज पिण्याचे पाणी ऑर्डर करता, तेव्हा विश्वास आणि भरवशानेच आपणास पाणी दिले जाते. आपण Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध ॲपवरुन ऑर्डर देऊ शकता किंवा आपण www.drinkwaterdaily.com वर ऑर्डर देऊ शकता. 

कंपनीचे संस्थापक अभिन शेट्टी आणि रबिन शेट्टी पेयजलाच्या उद्योगात उत्तम, गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या उद्देश व ध्येयाने काम करीत असून, भारतातील सर्व प्रमुख शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्याचे त्यांचे ध्येय आहे.

कस्टमर केअर - ८४४८४४७७२६
info@banaenvirotech.com

SAKAL READER CONNECT INITIATIVE

Edited By - Prashant Patil

loading image
go to top