ढेपे वाडा : सहकुटुंब कार्यक्रम, सहलींसाठी तसेच पारंपरिक पद्धतीने सण साजरे करण्यासाठी उत्तम ठिकाण!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

सहकुटुंब वास्तव्यासाठी अथवा सहलींसाठी तसेच साखरपुडा, लग्न, मुंज, वाढदिवस, स्नेहसंमेलने इत्यादी कौटुंबिक कार्ये आणि दिवाळी, भाऊबीज इत्यादी सण पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यासाठी उत्तम ठिकाण!

सहकुटुंब वास्तव्यासाठी अथवा सहलींसाठी तसेच साखरपुडा, लग्न, मुंज, वाढदिवस, स्नेहसंमेलने इत्यादी कौटुंबिक कार्ये आणि दिवाळी, भाऊबीज इत्यादी सण पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यासाठी उत्तम ठिकाण!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतीय संस्कृतीच्या इतिहासात एक नवा अध्याय घडवणाऱ्या आणि पुण्याच्या वैभवात भर घालणाऱ्या ढेपे वाड्याच्या वास्तूला नुकतीच ५ वर्ष पूर्ण झाली. पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाखाली असलेल्या आजच्या तरुण पिढीला आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांना आपली पारंपरिक भारतीय वास्तुशैली आणि त्यातील राहणीमान कळावे तसेच पारंपरिक भारतीय कला, संस्कृती जपली जावी, ह्या ध्यासापायी श्री नितीन व सौ. ऋचा ढेपे ह्यांनी वाडा बांधायचे पाहिलेले स्वप्न अनेक खडतर अडचणींचा सामना करत पूर्ण झाले.

ढेपेवाड्याच्या माध्यमातून पर्यटनाद्वारे लोकांना पुन्हा आपल्या पारंपरिक भारतीय संस्कृतीकडे नेण्याची त्यांनी एक प्रकारे चळवळ चालू केली असे म्हणता येईल, लोकांनी देखील ती उचलून धरल्यामुळे ढेपे वाड्याच्या संकल्पनेला उदंड प्रतिसाद मिळू लागला.
ढेपेवाड्याच्या वास्तूने एक नवा इतिहास घडवला असे अनेक जण सांगतात. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही आपली संस्कृती पोचवण्याचे काम ह्या वास्तूने केले आहे. ह्या यशाकडे सामाजिक दृष्टिकोनातूनही पहाणे खूप गरजेचे आहे. भारत सरकारकडून १८ डिसेंबर २०१८  रोजी मिळालेल्या बौद्धिक स्वामित्व हक्कांनी ह्यावर शिक्कामोर्तब केले आहे. ह्या हक्कांनुसार ‘ढेपे वाडा’ ही भारतीय पारंपरिक कला, संस्कृती, वास्तुशैली आणि राहणीमान पर्यटनाद्वारे जपणारी पूर्णपणे नव्याने बांधलेली भारतातील पहिली वास्तू ठरली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील ढेपेवाड्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे. जगभरातून ढेपे वाड्याच्या वेबसाइटला भेट देणाऱ्याची संख्याही लवकरच १ कोटीपर्यंत पोचेल. देश-विदेशातील हजारो पर्यटक दरवर्षी ढेपे वाड्याला ‘अनुभूती’ ह्या रात्रीच्या वास्तव्याच्या, ‘पर्वणी’ ह्या दिवसभराच्या सहलींद्वारे आणि भारतीय पारंपरिक पद्धतीने बारशी, साखरपुडे, लग्न, मुंजी, स्नेहसंमेलने, वाढदिवस, राखी पौर्णिमा व भाऊबिजेसारखे सण तसेच विविध प्रकारच्या कार्यशाळा, विविध कलाप्रकारांचे कार्यक्रम, इथे रात्रीच्या वास्तव्यास येऊन अथवा दिवसभराच्या सहलीद्वारे साजरे करतात. ह्या कार्यांचे व सहलीचे दर माफक आहेत. ऑफसीझनला दरांवर विशेष सवलत दिली जाते.
‘आपण इथे यावं, रमावं आणि इथलंच होऊन जावं आणि हेच कुठे तरी आपलं मूळ आहे ह्याची अनुभूती घ्यावी’ हे ढेपे वाडा परिवाराचं ब्रीदवाक्‍य आहे.

आरक्षणासाठी संपर्क : ९८२२६४०५९९, ९७६३२७६२३२
वेबसाईट : www.dhepewada.com
Email : dhepewada@gmail. com


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brands of pune dhepewada for event celebration Place