दामले यांचे लाडू World : घरगुती चवीच्या लाडूंसाठी प्रसिद्ध

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

श्रीराम दामले यांनी सदाशिव पेठेत कोकण उत्पादने आणि वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांचे दुकान २३ वर्षे चालवले. त्यानंतर  एका नामांकित खासगी ट्रॅव्हल कंपनीत नोकरी करत लाडूचा व्यवसायही सांभाळला.

‘हॅलो जयश्री, उद्या पाहुण्यांना सकाळी साडेसातलाच बाहेर पडायचे आहे. त्याआधी मटारच्या करंज्या मिळतील?’ मी भीतभीतच जयश्री दामले यांना फोन केला. तिचे तत्परतेने उत्तर आले, ‘मी पावणेसातला करंज्या तयार ठेवते.’ माझी पाहुण्यांच्या नाश्त्याची काळजीच दूर झाली.
‘दामले यांचे लाडू World’चा बोर्ड पाहिला आणि २० वर्षांपूर्वीचे फोनवरचे संभाषण आठवले. आम्ही मागणी करायची आणि जणू ‘अन्नपूर्णा’ असलेल्या जयश्रीने ती पुरवायची असे नेहमी असायचे. मटार करंजी, अनेक शाळांमध्ये गणपतीचा प्रसाद म्हणून तसेच मुलांसाठी मागविण्यात येणारे मोदक, लाडू, पेढे, साटोऱ्या, नारळ बर्फी; तसेच पुरणपोळी, गुळपोळी ते आजपर्यंतचे ‘दामले यांचे लाडू World’, हा दामले परिवाराचा प्रवास विस्मयचकित करणारा आहे. अर्थात, त्यासाठी जयश्री दामले, श्रीराम दामले आणि मुलगा अभिषेक यांचे उत्कृष्ट टीमवर्क कारणीभूत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

श्रीराम दामले यांनी सदाशिव पेठेत कोकण उत्पादने आणि वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांचे दुकान २३ वर्षे चालवले. त्यानंतर  एका नामांकित खासगी ट्रॅव्हल कंपनीत नोकरी करत लाडूचा व्यवसायही सांभाळला. अभिषेक याने ट्रॅव्हल टुरिझमचा कोर्स पूर्ण केल्यावर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली. काही वर्षे एका नामांकित खासगी ट्रॅव्हल कंपनीत नोकरी केली. २० वर्षे सुट्या स्वरूपात आणि काही ठरावीक  दुकानांमध्ये ठेवले जाणारे लाडू इतकेच व्यवसायाचे स्वरूप होते. परंतु २०१७ पासून ‘दामले यांचे लाडू World’ जोमाने सुरू झाले आणि अभिषेकने नोकरीला रामराम ठोकून पूर्णपणे व्यवसायात झोकून दिले. श्रीराम यांचा अनुभव, जयश्री यांच्या हातची घरगुती चव आणि अभिषेकची आधुनिक कल्पनांची जोड यांचा त्रिवेणी संगम झाल्याने ‘दामले यांचे लाडू World’ची  घोडदौड वेगात सुरू आहे. निवडक कच्चा माल, दर्जेदार घटक पदार्थांचा मुबलक वापर, आई, आजीच्या हाताच्या चवीची आठवण करून देणारी घरगुती चव यामुळे येथे तयार होणारे ‘दामले यांचे लाडू World’चे युनिक स्पेशालिटी असणारे स्पेशल रवा लाडू, डिंक लाडू, गुळपापडी लाडू, बेसन लाडू, मल्टिग्रेन लाडू, मेथी लाडू, मूग लाडू, नाचणी लाडू, पौष्टिक लाडू, शेंगदाणा लाडू, खमंग लाडू, तसेच आळीव लाडू (ऑर्डरप्रमाणे) यांना प्रचंड मागणी आहे. ग्राहकाने एकदा चव घेतली की तो कायम येतोच, शिवाय इतर ग्राहकांनाही घेऊन येतो.
गोडाला तिखटाची जोड देण्यासाठी बाकरवडी स्टीक, मेथी पुरी, पातळ पोहा चिवडा आदी पदार्थही येथे उपलब्ध आहेत. उत्कृष्ट दर्जा, स्वच्छता, आकर्षक पॅकिंग आणि जिभेवर रेंगाळणारी घरगुती चव ही वैशिष्ट्ये असलेल्या ‘दामले यांचे लाडू World’च्या लाडूंना केवळ पुण्यातच नाही तर पुण्याबाहेर एवढेच नव्हे तर दिवसेंदिवस परदेशांतही मागणी वाढते आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सण समारंभ, भेटी-गाठी, वाढदिवस, शुभेच्छा, दिवाळी भेट या सर्वांसाठी ‘दामले यांचे लाडू World’चे विविध प्रकारचे घरगुती चवीचे लाडू हा उत्तम पर्याय आहे. ज्येष्ठ नागरिकांना किंवा आजारी व्यक्तींना भेटायला जाताना हे लाडू आरोग्यासाठी उत्तम असल्याने हमखास नेले जातात. संक्रांतीला वस्तूंच्याऐवजी ‘दामले यांचे लाडू World’चे घरगुती चवीचे लाडू लुटण्याचा भगिनींनी नक्की विचार करावा. अनुभव, अपार कष्ट, सचोटी, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास आणि गणरायावरील नितांत श्रद्धा यांतून साकार झालेल्या आणि उत्तरोत्तर यशाचा सोपान चढणाऱ्या ‘दामले यांचे लाडू World’ला अनेक शुभेच्छा..!

 

संपर्क ः ८६९८०१९१५०, ७६६६२९९२३७, ८४११०५१०७८
Visit us : www.ladduworld.com  
(शब्दांकन ः विद्या साताळकर, पुणे)

SAKAL READER CONNECT INITIATIVE


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brands of pune : information about Damle laddu center