नेल आर्टची क्रेझ

अक्षता पवार
Sunday, 20 September 2020

लग्न, डोहाळे जेवण, कॉलेजची फ्रेशर्स पार्टी असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम, महिलावर्गात चर्चेचा विषय ठरतो तो नेल आर्टचा. एकवेळ मेहंदी नलसी किंवा शृंगाराचे इतर पर्याय नसले तरी नखांना रंगविण्यासाठी सर्व महिला तयार असतात. आपण काय घालतो?, याहून अधिक आपली नखे आकर्षित करण्याकडे महिलांचा कल असतो.

लग्न, डोहाळे जेवण, कॉलेजची फ्रेशर्स पार्टी असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम, महिलावर्गात चर्चेचा विषय ठरतो तो नेल आर्टचा. एकवेळ मेहंदी नलसी किंवा शृंगाराचे इतर पर्याय नसले तरी नखांना रंगविण्यासाठी सर्व महिला तयार असतात. आपण काय घालतो?, याहून अधिक आपली नखे आकर्षित करण्याकडे महिलांचा कल असतो. सध्याच्या तरुणाईमध्ये कपडे किंवा मेकअपसोबतच नेल आर्टचीही प्रचंड क्रेझ आहे. कोणताही सोहळा किंवा पार्टी असो, त्यात आकर्षणाचे सर्वांत मोठे केंद्र ठरते ते नेल आर्टचे. सौंदर्याबरोबरच नखे रंगविण्यालाही तितकेच प्राधान्य दिले जाते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नखांना रंगविण्यासाठी हजारो रुपये खर्च करणाऱ्या महिलावर्गामध्ये मात्र आता तसा उल्हास राहिला नाही. पुणे शहराचा विचार केला तर शिक्षण, नोकरी यांसारख्या कारणांमुळे इतर राज्यांतून शहरात आलेल्या युवती व महिलांची संख्या जास्त आहे. अशातच स्वतःला अपटूडेट ठेवण्यासाठी महिलांकडून सतत नवनवीन नेल आर्टची मागणी केली जाते. त्यामुळे शहरातील हाय प्रोफाइल भागांमध्ये नेल आर्टची विविध दालने उभारली गेली आहेत. इतकंच नाही तर ग्राहकाला हवी तशी डिझाइन तयार करून देण्यासाठी लागणारी साधनेही तितकीच आकर्षक असतात. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नेल आर्टची वाढती क्रेझ पाहता कित्येक आर्टिस्ट विदेशातून ही कला शिकून येत आहेत. पक्षीपासून नावापर्यंत सर्व काही या लहानग्या नखांवर साकारणे शक्‍य आहे. तर ज्यांची नखे लहान आहेत, त्यांच्यासाठी आर्टिफिशियल नखेसुद्धा बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कपड्यांना मॅचिंग किंवा कार्यक्रम कोणता आहे, त्यानुसार असंख्य नक्षिकाम नखांवर साकारण्याची कला नेल आर्टिस्टकडे आहे. आजच्या काळात अनेक महिलांनी नेल आर्टचा व्यवसाय सुरू केला असून, यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत असल्याचे त्या सांगतात. फक्त महिलाच नाही तर पुरुषांनीही या व्यवसायात पाऊल टाकले आहेत. परंतु, सध्या या ‘नेल आर्टचे’ रंग उडाले असून कोरोनामुळे या व्यवसायालाही मंदीचा सामना करण्याची वेळ आली आहे. एकीकडे संसर्गाच्या भीतीपोटी सार्वजनिक कार्यक्रमांची संख्या पूर्ण कमी झाली असून, घरगुती पद्धतीत होणाऱ्या कार्यक्रमांसाठी इतके पैसे खर्च करण्यासाठी महिलावर्ग इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे.

 

 

कोरोनामुळे केवळ पाच ते दहा टक्के व्यवसाय सुरू आहे. यातून उत्पन्न ८० टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. सर्व खबरदारी घेतली जात असतानाही ग्राहकांकडून मात्र पहिल्यासारखा प्रतिसाद मिळत नाही.

- मेहुल धामणे, अमारा नेल स्पा

 

SAKAL READER CONNECT INITIATIVE


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brands of pune : information about nail art