आेम इंजिनिअर्स : फॅब्रिकेशनमधील कल्पक आणि तंत्रशुद्ध काम

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

फॅब्रिकेशन क्षेत्रातील एक नामांकित संस्था म्हणून परिचित असलेल्या ओम इंजिनिअर्सची स्थापना श्री. सुरेश देसरडा यांनी १९८९ मध्ये पुण्यात केली. सुरुवातीला किचन ट्रॉलीज, सायकलच्या बास्केट्स, झोपाळे अशी लोखंडाच्या फॅब्रिकेशनची छोटी छोटी कामे करणाऱ्या या संस्थेने पुढे प्रत्येक वर्षी आपले कार्यक्षेत्र वाढवीत नेले आणि आजमितीला ओम इंजिनिअर्स ही स्ट्रक्चरल, अ‍ॅल्युमिनियम आणि स्टेनलेस स्टील फॅब्रिकेशनमधील लहान-मोठी सर्व प्रकारची कामे करणारी एक अग्रगण्य संस्था म्हणून नावाजली जाते.

फॅब्रिकेशन क्षेत्रातील एक नामांकित संस्था म्हणून परिचित असलेल्या ओम इंजिनिअर्सची स्थापना श्री. सुरेश देसरडा यांनी १९८९ मध्ये पुण्यात केली. सुरुवातीला किचन ट्रॉलीज, सायकलच्या बास्केट्स, झोपाळे अशी लोखंडाच्या फॅब्रिकेशनची छोटी छोटी कामे करणाऱ्या या संस्थेने पुढे प्रत्येक वर्षी आपले कार्यक्षेत्र वाढवीत नेले आणि आजमितीला ओम इंजिनिअर्स ही स्ट्रक्चरल, अ‍ॅल्युमिनियम आणि स्टेनलेस स्टील फॅब्रिकेशनमधील लहान-मोठी सर्व प्रकारची कामे करणारी एक अग्रगण्य संस्था म्हणून नावाजली जाते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोणतेही काम दिलेल्या वेळेत, सांगितलेल्या बजेटमध्ये आणि कामाचा दर्जा अत्युत्तम राखत पार पाडून संबंधित प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण करण्यासाठी ओम इंजिनिअर्स नेहमीच वचनबद्ध असतात. अतिशय कुशल, अनुभवी आणि सतत नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ओम इंजिनिअर्सने आजवर फॅब्रिकेशनची अनेक आव्हानात्मक कामे सहजरीत्या पार पाडली आहेत ज्यामध्ये एम.आय.टी. नेव्हल अकादमीसाठी बांधलेले ३६० मेट्रिक टन वजनाचे भव्य शिप, मॅजेस्टिक व्हेनिस धायरी या गृहप्रकल्पाचे आकर्षक प्रवेशद्वार आणि क्लब हाउस, वेट अन् जॉय वॉटर पार्क येथील उंचावर बांधलेल्या कॅनॉपीज व शेड्स, म्हस्के ग्रुप ऑफ हॉटेल्स, अवंतिका युनिव्हर्सिटी उज्जैन, महाराष्ट्र स्टेट वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनची विविध कार्यालये, प्रवीण मसालेवाले यांची हडपसर व मार्केटयार्ड येथील कार्यालये, कॉटन किंग, अण्णा भाऊ साठे नाट्यगृह, निकमार, अग्रसेन हायस्कूल विश्रांतवाडी अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण कामांचा समावेश आहे. याखेरीज पुणे महापालिकेच्या बी.आर. टी. प्रोजेक्ट्सची कामे, तसेच श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर, दादावाडी जैन मंदिर, गोडीजी पार्श्वनाथ संघ मंदिर, गुरुवार पेठ, पुणे व भिकारदास मारुती मंदिर अशा वेगवेगळ्या धार्मिक स्थळांची कामेही ओम इंजिनिअर्सने यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत. सध्या साधारणपणे ७००० स्क्वे. फूट जागेत कार्यरत असलेल्या ओम इंजिनिअर्सचा लवकरच आणखी मोठ्या जागेत विस्तार होणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपल्या कर्मचाऱ्यांनी सातत्याने नवनवीन गोष्टी आत्मसात कराव्यात आणि त्यातून त्यांची प्रगती व्हावीच; परंतु ग्राहकांच्याही सर्व अपेक्षा त्वरित पूर्ण व्हाव्यात यासाठी श्री. सुरेश देसरडा कायम प्रयत्नशील राहिले आहेत आणि आता नव्या पिढीचे प्रतिनिधी देवेन देसरडा हेदेखील त्यांच्या जोडीला या क्षेत्रातील नवनवीन शिखरे सर करण्यासाठी सिद्ध झाले आहेत.
सर्वसाधारणपणे फॅब्रिकेशन व्यवसायाकडे एक असंघटित कार्यक्षेत्र म्हणून पहिले जाते; परंतु या संकल्पनेला छेद देत, आपल्या कामाद्वारे ओम इंजिनिअर्सने संघटित समूहाद्वारे उत्तम काम कसे करता येते याचा एक आदर्शच निर्माण केला आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

 

अधिक माहितीसाठी संपर्क : 
९८२२४५६९३७ /९९२२४४४५४४
वेबसाइट : http://omengineers.in
ई मेल : omengineers.k@gmail.com

SAKAL READER CONNECT INITIATIVE

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brands of pune : information about om engineers