esakal | श्री माऊलीविश्‍व आयुर्वेद : आयव्हीएफ करण्यापूर्वी आयुर्वेद चिकित्सेचे महत्त्व
sakal

बोलून बातमी शोधा

shri maulivishva ayurveda.jpg

प्रत्येक जोडप्यासाठी बाळ होणे ही त्यांच्या आयुष्यातील सर्वांत आनंदाची गोष्ट असते; परंतु वारंवार गर्भधारणेसाठी प्रयत्न करूनही जेव्हा यश मिळत नाही, तेव्हा आधुनिक तंत्राचे सहाय्य घ्यावे लागते. ज्या अडचणींमुळे आयव्हीएफकडे जावे लागले त्या दूर न करता आयव्हीएफ केल्याने अपयश पदरात पडते. AMH कमी असणे, बीजांडांचा साठा कमी असणे. गर्भाशयातील अस्तर कमी तयार होणे, गर्भाशयाला सूज, पुरुष शुक्राणूंमधील दोष अशा अनेक कारणांमुळे अपयश येते. गर्भधारणा न होणे आणि गर्भधारणा होऊन तीन महिन्यांच्या आत गर्भपात होणे अशा अनेक केसेस या तंत्राचा वापर करूनही आढळतात.

श्री माऊलीविश्‍व आयुर्वेद : आयव्हीएफ करण्यापूर्वी आयुर्वेद चिकित्सेचे महत्त्व

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

प्रत्येक जोडप्यासाठी बाळ होणे ही त्यांच्या आयुष्यातील सर्वांत आनंदाची गोष्ट असते; परंतु वारंवार गर्भधारणेसाठी प्रयत्न करूनही जेव्हा यश मिळत नाही, तेव्हा आधुनिक तंत्राचे सहाय्य घ्यावे लागते. ज्या अडचणींमुळे आयव्हीएफकडे जावे लागले त्या दूर न करता आयव्हीएफ केल्याने अपयश पदरात पडते. AMH कमी असणे, बीजांडांचा साठा कमी असणे. गर्भाशयातील अस्तर कमी तयार होणे, गर्भाशयाला सूज, पुरुष शुक्राणूंमधील दोष अशा अनेक कारणांमुळे अपयश येते. गर्भधारणा न होणे आणि गर्भधारणा होऊन तीन महिन्यांच्या आत गर्भपात होणे अशा अनेक केसेस या तंत्राचा वापर करूनही आढळतात.

आमदार महेश लांडगे म्हणाले, 'लॉकडाउन करा, पण...'

आधुनिक तंत्र हे फक्त बीज आणि गर्भाशय याचा विचार करून उपचार ठरवते. आयुर्वेदात मात्र गर्भधारणा हे फक्त गर्भाशयाचे नाही तर सर्व धातूंचे कार्य आहे असे सांगितले आहे. यासाठी सर्व शरीरातील धातुरुपी घटक क्रमाने सक्षम करत नेल्यास गर्भप्राप्ती आणि गर्भधारणा दोन्ही उत्तम होतात. मुंबईतील एका पेशंटचे दोन वेळा आयव्हीएफ करूनही यश न मिळाल्यावर आता पुढे बिजांडाची क्षमता कमी असल्याने काही शक्य नाही असे सांगितले गेले. AMH कमी, दोन्ही बीजांडांची वाहीनलिका बंद, सतत पित्ताचा त्रास, गोळी घेतल्यावरच पाळी येत होती. मानसिक ताण खूप असायचा. वय ३८ वर्षे झाले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

प्रकृतीपरीक्षण व दैनंदिन आहारविहार पाहिल्यावर क्रमाने रसधातूपासून मज्जाधातूपर्यंत संतुलन साधण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे पित्ताचा त्रास कमी झाला. चार महिन्यांतच पाळी नैसर्गिक येऊ लागली. वर्षभर औषधी चिकित्सा आणि पंचकर्म केल्यावर सोनोग्राफीत बीजाची आणि अस्तराची वाढ योग्य दिसू लागली.
बीजवाहीनलिका बंद असल्यामुळे पुन्हा आयव्हीएफ करायला सांगितले. यावेळी मात्र उत्तम क्षमतेची बीजांड निर्मिती झाली. भ्रूणदेखील उत्तम तयार झाला. त्यानंतर त्याचे गर्भाशयात रोपण करण्यात आले. पेशंटचे वय ३९ वर्षे असतानाही गर्भधारणेच्या नऊ महिन्यांत कोणत्याही अतिरिक्त त्रासाशिवाय बाळंतपण सुखरूप झाले. आयुर्वेद आणि आधुनिक शास्त्र याचा योग्य संगम केल्यास असा उत्तम परिणाम साधता येतो.

वैद्य विनेश चंद्रकांत नगरे
(स्त्रीरोग तज्ज्ञ) (आयुर्वेद)
सदाशिव पेठ, पुणे, दादर प., मुंबई
9689471315, 7083880320
अधिक माहितीसाठी : www.smvayurveda.in

loading image