पार्श्व सेल्स कॉर्पोरेशन - टाइल्स, सॅनिटरी वेअर्सचा मिनी मॉल

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 August 2020

पार्श्व सेल्स कॉर्पोरेशन ही फर्म श्री. कौशिक मेहता यांनी १९८५ मध्ये अत्यंत अल्प भांडवल घेऊन स्थापन केली. सुरुवात मंगळवार पेठ येथे होलसेल बिल्डिंग मटेरियल Cast Iron पाईप्स, जीआय पाईप व फिटींगने केली. त्यानंतर त्यांचे लहान भाऊ सुनील, राजेश व कोमल त्यांच्याबरोबर जॉईन झाले व नवीन कंपनी जसे की जग्वार, कजारिया, निरालीची डिलरशिप घेऊन टाइल्स व सॅनिटरी वेअरचा व्यवसाय वाढवला.

घर महत्त्वाचे आहेच, परंतु तेवढेच महत्त्वाचे आहे त्याचे सुशोभीकरण. आणि त्याची पूर्तता करते पार्श्व सेल्स कॉर्पोरेशन.

पार्श्व सेल्स कॉर्पोरेशन ही फर्म श्री. कौशिक मेहता यांनी १९८५ मध्ये अत्यंत अल्प भांडवल घेऊन स्थापन केली. सुरुवात मंगळवार पेठ येथे होलसेल बिल्डिंग मटेरियल Cast Iron पाईप्स, जीआय पाईप व फिटींगने केली. त्यानंतर त्यांचे लहान भाऊ सुनील, राजेश व कोमल त्यांच्याबरोबर जॉईन झाले व नवीन कंपनी जसे की जग्वार, कजारिया, निरालीची डिलरशिप घेऊन टाइल्स व सॅनिटरी वेअरचा व्यवसाय वाढवला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्याबरोबर काळानुसार रिटेल शोरूमची गरज वाटल्याने त्यांनी १९८९ मध्ये पुण्यातील पहिले एसी शोरूम तयार केले. त्यामध्ये विद्या सिन्हा, रती अग्निहोत्री, बाबा कल्याणी, चंदू बोर्डे इत्यादी सेलेब्रिटींनी भेट देऊन माल खरेदी केला आहे.

पुणे मार्केट डेव्हलप होत गेल्याने पुण्यात मोठे शोरूम येत गेले. त्या वेळेला कौशिक मेहता व त्यांच्या बंधूंना वाटले की आता आपल्याला मोठ्या शोरूमची गरज आहे. आता आपली मॅनपॉवरही वाढली आहे. बरोबर नवीन पिढी, त्यांचा चुलता विनीत आणि धृमिल हे दोघे या व्यवसायात जॉईन झाले होते.

कौशिक मेहता यांचे एक स्वप्न होते की, सर्वांपेक्षा वेगळी शहराच्या बाहेर व प्रशस्त अशी शोरूम बनवायची. ती स्वप्नपूर्ती २८ फेब्रुवारी २०२० ला झाली. एक सुंदर व भव्य शोरूम कोंढवा येथे सुरू झाले. या शोरूम मध्ये वेगवेगळ्या ३० कंपनीचे प्रॉडक्ट डिस्प्ले केलेले आहेत. ही शोरूम फुल्ली एअर कंडिशन आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे बाथरूमचे एकवीस सॅम्पल मॉकअप केलेले असून कस्टमरला सिलेक्शनसाठी सोपे काम झाले आहे. शोरूममध्ये प्रशस्त जागा व तेथे इटली, जर्मनी, स्पेन, टर्की, इंडोनेशिया व इंडियनचे वेगवेगळे टाइल्स, सॅनिटरी, बाथरूम फिटिंग, सिंक, बाथटब, लाइटिंग प्रॉडक्ट फार सुंदर व वेगवेगळ्या थीम नुसार डिस्प्ले केलेले असून हा एक महाराष्ट्रातील एकमेव मोठा व जास्तीत जास्त प्रॉडक्ट डिस्प्ले असलेला टाइल्स व सॅनिटरी वेअरचा मिनी मॉल आहे. 

विशेष म्हणजे या शोरूमचे उद्धघाटन स्वतः जग्वॉरचे एमडी राजेश मेहराजी यांच्या हस्ते झाले. उद्घघाटन प्रसंगी, पुण्यातील व बाहेरील अनेक नामवंत बिल्डर्स, अग्रगण्य आर्किटेक्ट्स व मान्यवर उपस्थित होते. तसेच शोरूमच्या बाहेरच्या बाजूला गार्डन, गझिबो, फाउंटन, एक मिनी रिसॉर्ट साकारला आहे.

तसेच पार्किंगची भरपूर जागा आहे. कौशिक मेहता यांनी सांगितले की, सुरुवाती- पासून आमचे ध्येय प्रॉम्प्ट सर्व्हिस, रिझनेबल रेट व कस्टमर सॅटीस्फॅक्शन होते. ही परंपरा आजही कायम ठेवलेली आहे व पुढच्या पिढीला ही तीच परंपरा जपायला सांगितले आहे. त्यामुळे अल्प भांडवलात व्यवसाय सुरू करूनही आज एवढे मोठे एम्पायर ते उभे करू शकले आहेत. ३५ वर्षापासून पुण्याचे लहान-मोठे बिल्डर, आर्किटेक्ट व डिलर्समध्ये त्यांचे नाव फारच लोकप्रिय आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार वन स्टॉप सोल्युशन फॉर युवर ड्रीम होम आहे. 

पार्श्व सेल्स मध्ये आलेला ग्राहक हा कमीत कमी २ ते ३ तास सर्व पर्याय पाहिल्याशिवाय बाहेर पडत नाही. कारण त्याला इथे असंख्य पर्याय आणि मनासारखे डिझाइन पाहायला मिळतात.  तेव्हा पुण्यातील एक विश्वासू आणि ‘one stop solution for your dream home’ असलेल्या या ठिकाणी नक्की भेट द्या.

संपर्क : पार्श्व सेल्स कॉर्पोरेशन/अरिहंत इंटरप्राईजेस, सर्वे नंबर २७/११, मरळ प्लॉट, डी मार्ट पुढे, उजव्या बाजूला, खडी मशीन चौकाच्या अलीकडे, कोंढवा पुणे - ४११०४८ 
फोन नंबर : (०२०) २६९३४७०६/७, ९८२२६५३३३५/६

SAKAL READER CONNECT INITIATIVE

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brands of Pune Parshv Sales Corporation