esakal | रिलाईबल लिफ्टस इंडिया प्रा.लि : कोरोनाला रोखण्यासाठी लिफ्टमध्येही राखा ‘फिजिकल डिस्टन्स’
sakal

बोलून बातमी शोधा

Reliable-Lifts Pvt Ltd

पुण्यातील प्रसिद्ध इलेव्हेटर कंपनी घेऊन येत आहे ‘लिफ्टचा डॉक्टर’
कोरोनाच्या संसर्गापासून रोखण्यासाठी आता आपल्या सोसायटीच्या/ऑफिसच्या लिफ्टमध्येही ‘फिजिकल डिस्टन्स’ ठेवणे गरजेचे आहे. म्हणूनच पुण्यातील प्रसिद्ध रिलाईबल लिफ्टस इंडिया प्रा.लि कंपनी घेऊन येत आहे ‘लिफ्टचा डॉक्टर’.

रिलाईबल लिफ्टस इंडिया प्रा.लि : कोरोनाला रोखण्यासाठी लिफ्टमध्येही राखा ‘फिजिकल डिस्टन्स’

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुण्यातील प्रसिद्ध इलेव्हेटर कंपनी घेऊन येत आहे ‘लिफ्टचा डॉक्टर’ कोरोनाच्या संसर्गापासून रोखण्यासाठी आता आपल्या सोसायटीच्या/ऑफिसच्या लिफ्टमध्येही ‘फिजिकल डिस्टन्स’ ठेवणे गरजेचे आहे. म्हणूनच पुण्यातील प्रसिद्ध रिलाईबल लिफ्टस इंडिया प्रा.लि कंपनी घेऊन येत आहे ‘लिफ्टचा डॉक्टर’.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टचलेस ऑपरेटिंग सिस्टिम : लिफ्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला ज्या मजल्यावर जायचे आहे, त्या मजल्याच्या नंबरचे बटन दाबण्याची गरज नाही. कारण आता ‘लिफ्टचा डॉक्टर’ घेऊन आला आहे, आपल्याला ज्या मजल्यावर जायचे आहे. त्या ठिकाणच्या नंबरजवळ आपले बोट नेल्यास बटणाला विना टच करता २० मिमी अंतरावरूनच सेन्सरद्वारे आपला कॉल बुक करता येणार आहे. यामुळे कोरोनाच्या संसर्गापासून आपण स्वतःला व इतरांनाही वाचवू शकतो. विशेष म्हणजे तुमची कोणत्याही कंपनीची ऑटो डोअर लिफ्ट असली तरी त्या लिफ्टला ही ‘टचलेस ऑपरेटिंग सिस्टिम’ बसविता येणे सहज शक्य आहे. 

क्यूआर कोड स्कॅनर ऑपरेटिंग सिस्टीम : क्यूआर कोड स्कॅनर ऑपरेटिंग सिस्टीममध्ये आपल्याला लिफ्टमध्ये जाण्याआधीच बाहेर लावण्यात आलेला क्यूआर कोड आपल्या मोबाईलमध्ये स्कॅन केल्यास आपल्याला कोणत्या मजल्यावर जायचे आहे त्या मजल्यांचे ऑप्शन येणारं आहे. त्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये त्या मजल्याचा नंबर प्रेस केल्यास थेट त्या मजल्यावर जाता येणार आहे. यामुळे तुमची लिफ्ट कोणत्याही कंपनीची असली तरीही लिफ्टमधील कोणत्याही बटणाला टच न करता आपल्याला इच्छितस्थळी जाता येणार आहे.

यूव्ही क्लिनर सिस्टीम  : लिफ्टमध्ये अनेकजण नॉर्मल लिक्वीड सॅनिटायझर करतात. त्यामुळे लिफ्टचे इलेक्ट्रॉनिक पार्टस खराब होतात शिवाय काही ठिकाणी नॉर्मल लिक्वीड सॅनिटायझरमुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र यूव्ही क्लिनर सिस्टीममध्ये आपल्या लिफ्टमधून प्रवासी उतरून गेल्यानंतर आपली लिफ्ट ही ‘ऑटोमॅटिक’ यूव्ही सॅनिटायझर होणार आहे. यूव्ही सॅनिटायझरमुळे लिफ्टचे इलेक्ट्रॉनिक पार्टस खराब होणार नाहीत. त्यामुळे लिफ्टमधून कोरोनाचा संसर्ग टाळता येणे सहज शक्य आहे. चला तर मग... कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आजच आपल्या सोसायटी अथवा ऑफिसमधील लिफ्टला ही नवीन टेक्नॉलॉजी बसवून घेऊया, तेही कमी बजेटमध्ये.

रिलाईबल लिफ्टस इंडिया प्रा.लि कंपनीच्या सर्व्हिसेस -

  • आपल्या सोसायटीत, ऑफिसमध्ये असणाऱ्या जुन्याच लिफ्टला आम्ही ‘मॉडिफाय’ करून अगदी नवीन लिफ्ट करून देऊ तेही अगदी कमी बजेटमध्ये.
  • होम लिफ्ट्स, कार लिफ्ट्स, हॉस्पिटल लिफ्ट्स, पॅसेंजर लिफ्ट्स, हायड्रॉलिक लिफ्ट्स, एमआरएल लिफ्ट्स
  • लिफ्ट्सची वार्षिक देखभाल व सेवा (AMC)
  • तज्ज्ञ इंजिनिअर्स व स्टाफ
  • २४ तास कॉल सेंटर सेवा  

संपर्क : ८७९३२४२१२१, ९५१८३८९१८५,९३७०६५५६४७
वेबसाइट : www.reliablelifts.in
मेल : service@reliablelifts.in

SAKAL READER CONNECT INITIATIVE

Edited By - Prashant Patil

loading image
go to top