योगेंद्र डी. अष्टेकर आणि कंपनी : परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 August 2020

ज्या काळात लक्ष्मी रोडचा परिसर व्यावसायिक बाजारपेठ म्हणून ओळखला जात नव्हता त्या काळात श्री. दत्तात्रय अष्टेकर यांनी लक्ष्मी रोडवर सराफी पेढी सुरू केली. त्यापाठोपाठ इतर अनेक व्यावसायिकांनी लक्ष्मी रोडवर आपापली दुकाने थाटण्यास प्रारंभ केला आणि लक्ष्मी रोड हा भाग शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्व प्रकारच्या बाजारपेठेचे मुख्य केंद्र म्हणून उदयास येण्यात मोठी मदत झाली.

ज्या काळात लक्ष्मी रोडचा परिसर व्यावसायिक बाजारपेठ म्हणून ओळखला जात नव्हता त्या काळात श्री. दत्तात्रय अष्टेकर यांनी लक्ष्मी रोडवर सराफी पेढी सुरू केली. त्यापाठोपाठ इतर अनेक व्यावसायिकांनी लक्ष्मी रोडवर आपापली दुकाने थाटण्यास प्रारंभ केला आणि लक्ष्मी रोड हा भाग शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्व प्रकारच्या बाजारपेठेचे मुख्य केंद्र म्हणून उदयास येण्यात मोठी मदत झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजमितीला पुणेकरांच्या सेवेत रुजू असलेली एक विश्वासार्ह सराफी पेढी म्हणून ‘योगेंद्र डी. अष्टेकर आणि कंपनी’ यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. पूर्वीच्या काळी सोन्याची शुद्धता ओळखण्याची कसलीही सोय उपलब्ध नसताना केवळ सचोटीच्या व्यवहारावर दत्तात्रय अष्टेकरांनी पुणेकर ग्राहकांचा विश्वास संपादन केला आणि तेव्हापासून आजतागायत या पेढीचे नाव शुद्ध व चोख सोने देणारी पेढी म्हणून आदराने घेतले जाते.

सध्या या दुकानाची धुरा आजच्या पिढीतील श्री. योगेंद्र अष्टेकर हे यशस्वीपणे सांभाळत असून लक्ष्मीरोड वर या पेढीची दोन दुकाने ग्राहकांच्या सेवेत रुजू आहेत. गेल्याच वर्षी या पेढीने सासवड येथे नव्या दालनाचा शुभारंभ केला. या तिन्ही दालनांतून सर्व प्रकारची ज्वेलरी, डायमंड ज्वेलरी, BIS हॉलमार्क असलेले सोन्याचे दागिने, चांदी व सोन्याचे कमी वजनाचे आधुनिक व अनेकविध प्रकारचे आकर्षक दागिने उपलब्ध आहेत. तसेच मंगळसूत्र, बांगड्या, पाटल्या, हार, अंगठी, चेन अशा लग्नसराईसाठी आवश्यक दागिन्यांच्या असंख्य व्हरायटीज इथे बघायला मिळत असल्यामुळे अनेक ग्राहक इथे आवर्जून खरेदीसाठी येतात.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने चांदीची सर्व उपकरणी जसे की लोटी -भांडे, पळी, ताम्हण, निरांजन, उदबत्तीचे घर, समई आणि चांदीच्या दूर्वा, कमळ या वस्तूही आकर्षक स्वरूपात आणि योग्य दरात येथे मिळू शकतात. सचोटी आणि विश्वासार्ह व्यवहार हे ब्रीद असणाऱ्या  ‘योगेंद्र डी.अष्टेकर आणि कं.’ तून एकदा तरी खरेदी करायलाच हवी.

अधिक माहितीसाठी संपर्क :  
कुंटे चौक, लक्ष्मी रोड : (०२०) २४४९३३२८ / २४४५४७३४
चांदणी चौक, सासवड : (०२११५) - २२३३४४

SAKAL READER CONNECT INITIATIVE

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brands of Pune yogendra d ashtekar and Company