पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समायोजन बदल्यांना अखेर ब्रेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher
पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समायोजन बदल्यांना अखेर ब्रेक

पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समायोजन बदल्यांना अखेर ब्रेक

सोमेश्वरनगर - पुणे महानगरपालिका व बारामती नगरपरिषद हद्दवाढीमुळे शहरात समाविष्ट झालेल्या ३८ गावांतील ५८६ शिक्षकांच्या (Teacher) समायोजन बदल्या (Transfer) स्थगित करण्याचे आश्वासन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिले आहे, अशी माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमधील कागल येथील निवासस्थानी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेण्यात आली. पुणे महानगरपालिका व नगरपालिका हद्दवाढ झाल्या जिल्हा परिषद हद्दीतील 38 गावे शहरी हद्दीत गेली. सोबत प्राथमिक शाळाही समाविष्ट झाल्या. मात्र त्या गावातील ५८६ शिक्षकांचे शाळांसह वर्गीकरण झाले नाही. यासाठी २५ जुलै २०१९च्या फडणवीस सरकारच्या शासन निर्णयाने शिक्षक वर्ग करण्यात प्रतिबंध केला होता. यामुळे शाळांमधील मुके वाऱ्यावर सोडली जाणार असल्याचे दैनिक सकाळने वेळोवेळी मांडले. दरम्यान, जिल्हा परिषदेने या शिक्षकांच्या सोमवारी (ता. १७) ग्रामीण शाळांवर समायोजन बदल्या आयोजित केल्या होत्या. शैक्षणिक वर्ष सुरू असताना सुरू केलेल्या या अवकाळी बदल्यांवर शिक्षकांनी बहिष्कार घातला होता.

यामुळे 25 जुलैच्या आदेशात दुरुस्ती करणेत यावी व तोपर्यंत पुणे जिल्हा परिषदेने सुरू केलेली समायोजन प्रक्रिया तातडीने स्थगित करण्यासाठी जिल्हा परिषदेला लेखी आदेश देण्यात यावेत अशी मागणी शिक्षकांच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्याकडे केली. त्यांनी बदल्या स्थगित करण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा: Pune Latest News Update| पुण्यात धान्याच्या किराणा दुकानला भीषण आग, पाहा व्हिडीओ

तसेच आगामी जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रियेबाबत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली, बदली प्रक्रिया गतिमान करून विस्थापित शिक्षकांना न्याय दिला जाईल, आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी शिक्षक संघासोबत स्वतंत्र बैठक बोलावून संघाच्या शिफारशी स्वीकारण्यात येतील असे आश्वासनही ग्रामविकास मंत्री यांनी दिले असल्याची माहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली यामुळे ५८६ शिक्षकांना आणि 25 हजार मुलांना दिलासा मिळाला आहे.

२७ जानेवारीला प्राथमिक चर्चा

बदली प्रक्रिया गतिमान करणे व आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या सूचनेनुसार राज्य सरकार व शिक्षक संघाची संयुक्त बैठक होणार असून या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास २७ जानेवारी रोजी मुंबई येथे बोलाविले आहे, अशी माहितीही बाळासाहेब मारणे यांनी दिली.

Web Title: Break Adjustment Transfers Of Primary Teachers In Pune District Finally Come To An End

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsteacherTransfers