
लग्न मोडल्याचा राग त्याच्या मनामध्ये होता. त्यामुळे त्याने ईमेल, फेसबुक, इन्स्टाग्राम, पिन्टरेस्ट यासारख्या सोशल मीडियावर तरुणीच्या नावाने बनावट खाती उघडली.
पुणे : मुलगा परदेशात संगणक अभियंता, तर मुलगीही संगणक अभियंता. कुटुंबाच्या पुढाकाराने दोघांचेही लग्न जमले, त्यांचा साखरपुडाही झाला, पण काही कारणाने त्यांचे लग्न मोडले. त्यामुळे संतप्त झालेल्या संगणक अभियंत्याने तरुणीचे फेसबुक अकाऊंट हॅक करून तसेच अन्य सोशल मीडियावर तिला आणि तिच्या कुटुंबीयांना त्रास देण्यास सुरूवात केली. अखेर तरुणीने पोलिस ठाणे गाठले, पोलिसांनीही प्रकरणाचे गांभीर्य ओळखत संगणक अभियंत्याला अटक करून चांगलाच पोलिसी खाक्या दाखविला!
- 'कर्जफेड न करणाऱ्या थकबाकीदारांची नावे उघड करण्यास युनियन बँकेचा नकार'
आदेश बोरा (रा.कात्रज) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 27 वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही संगणक अभियंता आहे, तर आदेश हा देखील संगणक अभियंता असून तो परदेशामध्ये एका कंपनीमध्ये नोकरीला आहे. लग्न करण्यासाठी तो पुण्यात आला होता. काही महिन्यांपूर्वी फिर्यादी तरुणी आणि आदेशचे लग्न जुळले होते. दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांचा सारखरपुडाही उरकला होता. दरम्यान, काही कारणामुळे फिर्यादी आणि तिच्या कुटुंबीयांनी हे लग्न मोडले.
- पुणे पदवीधर मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; जादुई आकडा गाठण्यासाठी चुरस
दरम्यान, लग्न मोडल्याचा राग त्याच्या मनामध्ये होता. त्यामुळे त्याने ईमेल, फेसबुक, इन्स्टाग्राम, पिन्टरेस्ट यासारख्या सोशल मीडियावर तरुणीच्या नावाने बनावट खाती उघडली. त्याद्वारे त्याने फिर्यादी तरुणी, तिचे कुटुंबीय आणि मित्रांना त्रास देण्यास सुरूवात केली. त्याचबरोबर त्याने तरुणीचे फेसबुक खातेही हॅक केले होते. या सगळ्या प्रकाराचा तरुणीला मोठ्या प्रमाणात मनस्ताप सुरू होता. या प्रकारास कंटाळून फिर्यादीने थेट पोलिस भारती विद्यापीठ पोलिस ठाणे गाठले. तेथे फिर्याद दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)