Pune Rain : लेक टाऊनजवळील पूलच गेला वाहून; पाणीच पाणी (Video)

Pune Rain : लेक टाऊनजवळील पूलच गेला वाहून; पाणीच पाणी (Video)

पुणे : पुणे शहरात कात्रज भागातील लेक टाऊन सोसायटीजवळील पूलच मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याची घटना घडली आहे. तसेच या भागात पाणीच पाणी असल्याचे पाहायला मिळत आहे. 

पुणे शहर व उपनगरात बुधवारी रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. कात्रज परिसरात पावसाचा जोर जास्त असल्याने कात्रजचा ऐतिहासिक तलाव व सर्पोद्यानमधील तलाव भरून वाहू लागले. हे सर्व पाणी ओढ्यातून वाहू लागल्याने लेक टाऊऩजवळील पूल वाहून गेला, तसेच बाजूचा रस्ताही वाहून गेला. यामुळे राजस सोसायटीकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे.  

आज (गुरुवार) सकाळीही पावसाचा परिणाम दिसून येत आहे. अप्पर ते सातारा रस्त्यापर्यंत संपूर्ण वाहतूक कोंडी आहे. वाहतूक धीम्या गतीने चालू आहे. के के मार्केट जाणार रस्ता बंद केल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी आहे. या रस्त्यावरील सर्व सिग्नल बंद आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com