panshet khanapur road bridge close
sakal
वेल्हे - पानशेत (ता. राजगड) ते पुणे रस्त्यावरील पानशेत वसाहतीजवळील ६८ वर्षे जुना हा पूल अत्यंत जीर्ण व धोकादायक झाल्याने जड व हलक्या वाहनांना यापुढे येथून प्रवास करता येणार नाही. हा मोठा पूल वाहतुकीसाठी तात्काळ बंद करण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी दिले आहेत. यामुळे परिसरातील 28 पेक्षा अधिक गावांना याचा मोठा फटका बसणार असून या पुलावरून हलक्या वाहनांना प्रवास करण्याची परवानगी मिळण्याची मागणी पानशेत परिसरातील नागरिक करत आहेत.