
सिंहगड रस्ता (पुणे) : प्रयेजा सिटीतून सनसिटीकडे जाणारा पूल वाहून गेला, तर फनटाईम वडगाव बु.कडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था देखील बिकट झाली आहे. इकडे आड अन् तिकडे विहीर, अशी आमची स्थिती झाली आहे, असे प्रयेजा पर्ल येथील रहिवासी निलेश घोडके यांनी सांगितले.
बुधवारी झालेल्या पावसाने पूल पुन्हा वाहून गेला आहे. प्रयेजा सिटी, प्रयेजा पर्ल आणि प्रयेजा पुरम या तीन सोसायट्या असून, येथे 350 घरे आहेत. प्रयेजा सिटीला जोडणारा दोन्ही बाजुच्या पुलाचा रस्ता वाहून गेला आहे. आतापर्यंत अनेकवेळा हा पूल बांधण्यात आला. सनसिटीकडून प्रयेजा सिटीकडे जाणारा आणि राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा सेवा रस्त्यांना जोडणारा हा पूल आहे. यापूर्वीही अनेक वेळा वाहून गेला आहे. वेळोवेळी त्याविरोधात आवाज उठविल्यावर तात्पुरती डागडुजी केली जाते. पूल खुला केला जातो. वादळीवाऱ्यासह पाऊस आल्यानंतर पुन्हा परिस्थिती 'जैसे थे'च रहाते. त्यामुळे परिसरातील नागरिक वैतागले आहेत.
नांदेड सिटीकडून प्रयेजा सिटी मार्गे राष्ट्रीय महामार्गाने जाणारे रोहित जाधव म्हणाले, की गेल्या चार वर्षांपासून आम्ही या रस्ता दुरुस्तीच्या पाठीमागे लागले आहोत. याबाबत संबंधित सर्व सरकारी विभागांना ट्वीट करून, तसेच निवेदने देऊन माहिती कळवली. त्याचा पाठपुरावा केला मात्र, केवळ डागडुजी केली जाते. वरकरणी काम केले जाते. कायमस्वरूपी तोडगा काढून दिला जात नाही.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
या भागातील मधुकोषमधील रहिवासी अमित भेंडे म्हणाले, की या पुलावरून मोठ्या प्रमाणात जड वाहतूकदेखील होत असते. या भागात असणाऱ्या सिमेंटच्या वाहतुकीसाठी जड वाहने वारंवार जातात. त्यामुळे येथील पूल आणि रस्ते वारंवार खराब होतात, हे रस्ते बनवताना उत्तम दर्जाचे बनवले जात नसल्याने अशी परिस्थिती वारंवार उद्भवत आहे. या प्रश्नाबाबत 'सकाळ'ने देखील वारंवार पाठपुरावा केला होता. या प्रश्नाबाबत आवाज उठवल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपाचे काम होत असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज असल्याचे येथील नागरिक म्हणाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.