
Raj Thackeray : राज ठाकरेंना आव्हान देणारे बृजभूषण पुण्यात येणार; मनसे विरोध करणार?
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याला विरोध करणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पुण्यात येणार आहेत. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना बृजभूषण सिंह यांच्या हस्ते लावण्यात येणार असल्याची माहिती आहे. तर त्यांच्या या दौऱ्यावर मनसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं मात्र मनसे त्यांच्या दौऱ्याला कोणताच विरोध करणार नाही अशी माहिती मनसेचे पदाधिकारी वसंत मोरे यांनी दिली आहे.
हेही वाचा - Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’
दरम्यान, बृजभूषण सिंग यांना कोणताही विरोध करणार नाही अशी भूमिका मनसेने घेतली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच यासंदर्भातले आदेश दिले असल्याचं मनसे नेते वसंत मोरे यांनी सांगितलं. तर मनसेने बृजभूषण यांच्या संदर्भात माघार घेतली का अशा चर्चा आता सुरू झाल्या असून वसंत मोरे यांनी यावर उत्तर दिलं आहे.
हेही वाचा: Viral Video : हे माणसं आहेत की प्राणी? आनंद महिंद्रांचं ट्वीट चर्चेत
"प्रकृती ठीक नसल्याने राज ठाकरे हे अयोध्येला गेले नव्हते. आमच्याही अंगाला माती लागलेली आहे. कुस्त्या कशा खेळायच्या ते आम्हालाही चांगल्या पद्धतीने माहिती आहेत पण आम्ही फक्त राज ठाकरे यांच्या आदेशामुळे शांत आहोत. राज ठाकरे जरी अयोध्येत गेले नसले तरी सुद्धा मनसैनिक यांनी त्याच दिवशी अयोध्येत जाऊन दर्शन घेतलं. मनसे कुणाच्या दावणीला बांधली गेली नाही. मनसेवर कोणाचेही बंधनं नाहीत" अशी माहिती मनसेचे पुण्यातील पदाधिकारी वसंत मोरे यांनी दिली आहे.