कोरोनापश्चात अभ्यासक्रमात उद्योजकता आणा : मुणगेकर

Bring entrepreneurship in course after Corona outbreak said Mungekar
Bring entrepreneurship in course after Corona outbreak said Mungekar

पुणे : कोरोना नंतरच्या जगात बेरोजगारी वाढणार आहे. त्यामुळे उद्योगांच्या गरजेनुसार आणि स्वयंरोजगाराला अनुकूल असे अभ्यासक्रम तयार करावे लागतील, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारती विद्यापीठाच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. मुणगेकर यांनी प्राध्यापक आणि शिक्षकेतर सेवक यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यूट्युब चॅनेलच्या माध्यमातून या व्याख्यानांचे  आयोजन करण्यात आले होते. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ शिवाजीराव कदम, कार्यवाह आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे प्र कुलगुरू डॉ. विश्वजित कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे,सह कार्यवाह डॉ. के. डी. जाधव, डॉ. एम. एस. सगरे, व. भा. म्हेत्रे, कुलसचिव जी. जयकुमार यावेळी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

डॉ मुणगेकर म्हणाले, कोरोनाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार असून, त्याची मोठी किंमत भारतासारख्या विकसनशील देशाला मोजावी लागणार आहे. विकास दरात ऐतिहासिक घसरण होणार आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे अशा काळात नोकरीच्या मागे न लागता विद्यार्थी स्वतःच्या कुवतीनुसार छोटे मोठे उद्योग करून अर्थार्जन करू शकतील, असे सामर्थ्य विद्यापीठांना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करावे लागेल. प्राध्यापकानी केवळ ग्रंथालयात बसून अभ्यासक्रम न ठरवता औद्योगिक क्षेत्रातील लोकांच्या काय अपेक्षा आहेत, याचाही विचार केला पाहिजे. लॉकडाऊन संपल्यानंतर पंतप्रधानांनी सर्व राज्याच्या  मुख्यमंत्र्यांशी आणि जनतेशी संवाद साधून पुढची दिशा काय असेल हे स्पष्ट केले पाहिजे. लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी मजुरांना त्यांच्या गावी जाण्याची संधी मिळाली असती, तर चार कोटी मजुरांची ससेहोलपट झाली नसती."

कोरोनाग्रस्तांवर उपचार करून घरी परतली नर्स; पतीने केले अशाप्रकारे स्वागत...

डॉ. विश्वजित कदम म्हणाले,  "कर्मवीर भाऊराव पाटील  यांच्या संस्कारातून आणि महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून डॉ. पतंगराव कदम  यांना शैक्षणिक कार्याची प्रेरणा मिळाली. बहुजन समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत त्यांनी शिक्षणाची गंगा भारती विद्यापीठाच्या माध्यमातून नेली. भारती विद्यापीठाने केवळ पदवीधर तयार केले नाहीत, देशाचे सुसंस्कृत नागरिक तयार केले. कोरोनाच्या संकटात डॉक्टर, नर्सेस, पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी आपल्या प्राणाची पर्वा न करता जे योगदान देत आहेत. त्याविषयी आपण कायम कृतज्ञ राहिले पाहिजे. कोरोना नंतर येणारी आव्हाने पेलण्यासाठी विद्यापीठातील सर्व घटकांनी सज्ज असले पाहिजे." 

घराच्या ओढीने काळीज तुटत होतं, पण असा झाला घोळ... 

डॉ शिवाजीराव कदम म्हणाले, "कोरोनाच्या या संकटात संशोधनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. संशोधनात मानवी समूहाचे अस्तित्व टिकवण्याचे सामर्थ्य असले पाहिजे. संशोधन हा विद्यापीठाचा आत्मा आहे, असे आपण आजवर म्हणत होतो. समाजाचे प्राण वाचविण्याचे काम संशोधनातून झाले पाहिजे ही काळाची गरज आहे."

आता आम्ही घरी जायचे कसे? राज्य सरकारने केली विद्यार्थ्यांची फसवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com