CM Devendra Fadnavis
sakal
पुणे
CM Devendra Fadnavis : अजित पवार यांनी शब्द पाळला नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांची पुण्यात नाराजी
लढती मैत्रिपूर्ण होतील, आपण एकमेकांविरुद्ध बोलणार नाही, असे आम्ही ठरवले होते. आम्ही शेवटपर्यंत ते पाळले, पण अजित पवार यांनी शब्द पाळला नाही, ते असे का वागले, हे मला माहिती नाही.
पुणे - पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये युती करता येणार नाही. या लढती मैत्रिपूर्ण होतील, आपण एकमेकांविरुद्ध बोलणार नाही, असे आम्ही ठरवले होते. आम्ही शेवटपर्यंत ते पाळले, पण अजित पवार यांनी शब्द पाळला नाही, ते असे का वागले, हे मला माहिती नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.

