Mr Asia 2025 : देशाचे प्रतिनिधित्व करत मनोज बोचरे यांचे दुबईत चमकदार यश
Dubai Championship : जुन्नरचे मनोज बोचरे यांनी दुबईतील मिस्टर एशिया २०२५ स्पर्धेत कांस्यपदक पटकावत भारताच्या आणि पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
जुन्नर : दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘मिस्टर एशिया बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप २०२५’ स्पर्धेत मनोज शंकर बोचरे यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत कांस्यपदक पटकाविले. यामुळे देशाचे तसेच पोलिस दल व शिवजन्मभूमी जुन्नरचे नाव राष्ट्रीय पटलावर झळकले आहे.