स्विफ्ट गाडीचा टायर फुटल्याने अपघात; बहिण व भाऊ दोघेही ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

स्विफ्ट गाडीचा अचानक टायर फुटल्याने गाडी दुभाजकावरून विरुद्ध बाजूच्या लेनवरून येणाऱ्या कंटेनरला धडकल्याने अपघातात स्विफ्टमधील बहिण व भाऊ दोघेही ठार.

Accident : स्विफ्ट गाडीचा टायर फुटल्याने अपघात; बहिण व भाऊ दोघेही ठार

कुरकुंभ - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळद (ता. दौंड) येथे पुण्याकडून भरधाव वेगात जाणाऱ्या स्विफ्ट गाडीचा अचानक टायर फुटल्याने गाडी दुभाजकावरून विरुद्ध बाजूच्या लेनवरून येणाऱ्या कंटेनरला धडकल्याने अपघातात स्विफ्टमधील बहिण व भाऊ दोघेही ठार झाले. अपघात गुरुवारी (ता. 22) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला.

पुणे-सोलापूर महामार्गावरून पुण्याकडून भालकी (जि. बिदर) गावाकडे सुट्टीसाठी स्विफ्ट (एमएच. 06, बीयु. 4089) गाडीतून भरधाव वेगात जात असताना मळद हद्दीत अचानक स्विफ्टचा टायर फुटला. त्यामुळे स्विफ्ट दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूच्या सोलापूर लेनवरील कंटेनरला (एमएच. 43, वाय. 4669) जोरात धडकली. अपघातात कंटेनरच्या धडकेने स्विफ्टची पुढील व डावी बाजू फाटली.

अपघातात स्विफ्टमधील शिल्पा तुलशी गिरी (वय-30) या गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाल्या. तर गाडी चालविणारे त्यांचा भाऊ साधव गौरव गिरी (वय 24, रा. भालकी, जि. बिदर) यांचा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. अपघातात मृत्यु झालेल बहिणभाऊ सुट्टी लागल्याने पुण्याहून गावाकडे जात होते. मात्र मृत्यूनं त्यांना रस्त्यात काढलं. बहिण शिल्पाचा गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाल्या.‌ तर भाऊ साधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताचा पुढील तपास पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. बी.‌राऊत करीत आहेत.