Pune Crime: सख्ख्या भावानेच काढला भावाचा काटा; पुण्यातील धक्कादायक घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news murder of college student due to fight between senior and junior nagpur

Pune Crime: सख्ख्या भावानेच काढला भावाचा काटा; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : सख्ख्या भावानेच आपल्या लहान भावाचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कोंढवा भागात घडली आहे. दारू पिऊन त्रास देत असल्याने वाद झाले आणि यातच मोठ्या भावाने लहान भावाचा गळा दाबून खून केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील गोकुळनगर मध्ये ही घटना घडली आहे. आकाश यशवंत भोसले (वय २९) असं आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

(Pune Crime Latest Updates)

अधिक माहितीनुसार, आकाश व तेजस हे दोघे सख्खे भाऊ आहेत. तेजसला दारूचे व्यसन होते, तसेच त्याच्यावर गुन्हे दाखल होते. दारूच्या नशेत तो अनेक वेळा घरातील लोकांना शिवीगाळ करायचा म्हणून आकाश हा तेजस पासून वेगळा राहत होता. दरम्यान, शुक्रवारी रात्री तेजस घरी दारू पिऊन आला आणि घरातील लोकांना मारहाण करू लागला होता. त्यानंतर त्याच्या आईने ही माहिती आकाशला दिली. आकाश तिथे आल्यावर दोघा भावांमध्ये वादावादी झाली.

त्यानंतर रागाच्या भरात आकाशने तेजस चा गळा दाबून त्याला ढकलून दिले. घरातील व्यक्तींना तो दारूच्या नशेत असल्यामुळे तो पडून राहिला असं वाटलं. त्यामुळे त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. सकाळी तेजसला घरच्यांनी उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तो उठला नाही. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर आरोपी आकाशला पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: Brother Murder Younger Drunk Brother Arrested Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newscrimemurder