chandrakant chaskar
chandrakant chaskarsakal

Mahalunge Padwal Crime : किरकोळ कारणावरून सख्या भावाने केला भावाचा खून

शेवग्याच्या शेंगा तोडल्याचा राग मनात धरून सख्या भावाने व त्यांच्या मुलांनी मारहाण करून सख्या भावाचा केला खून
Published on

महाळुंगे पडवळ - साबरेमळा-महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथे शेवग्याच्या शेंगा तोडल्याचा राग मनात धरून सख्या भावाने व त्यांच्या मुलांनी लाथा बुक्यांनी मारहाण करून चंद्रकांत सदाशिव चासकर (वय-६९) यांचा खून केला आहे. बुधवारी (ता. २६) सकाळी सदर प्रकार घडला.

भाऊ सुभाष सदाशिव चासकर, भावजय मंदा सुभाष चासकर, पुतणे सचिन सुभाष चासकर आणि नितीन उर्फ दत्ता सुभाष चासकर यांच्या विरोधात मंचर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

महाळुंगे पडवळ येथील सामायिक शेतजमीन वाटपावरून चंद्रकांत चासकर व सुभाष चासकर या दोन भावांमध्ये वाद सुरू आहे. रुपाली किरण चासकर शेतातील शेवग्याच्या शेंगा आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी शेवगा तुमच्या बापाचा आहे का? शेवग्याला हात लावू नका.

पाणी भरायला तुमचा बाप येतो का? असे म्हणत सुभाष चासकर यांनी दमदाटी आणि शिवीगाळ करून शेवग्याच्या शेंगा हातातून ओढून घेतल्या. त्यावेळी किरण चासकर हे जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांनाही चुलते सुभाष चासकर यांनी शिवीगाळ करून मुलांना पुण्याहून बोलवून तुमच्याकडे बघतो, अशी धमकी दिली.

बुधवारी (ता. २६) रोजी सकाळी आठ वाजता चंद्रकांत चासकर यांच्या घरासमोर त्यांचे भाऊ सुभाष सदाशिव चासकर, भावजय मंदा सुभाष चासकर, पुतणे सचिन सुभाष चासकर, नितीन उर्फ दत्ता सुभाष चासकर हे सर्वजण आले.

शिवीगाळ दमदाटी करून त्यांनी चंद्रकांत चासकर यांना धक्का देऊन खाली जमिनीवर पाडले, त्यानंतर चौघांनीही त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. सुभाष चासकर हे चंद्रकांत चासकर यांच्या छातीवर बसून त्यांना ठोसे मारत होते. त्यावेळी मंदा चासकर यांनी पाय धरले होते. तर सचिन व नितीन हे लाथा बुक्क्यांनी मारहाण करत होते.

वडिलांना वाचवण्यासाठी किरण चासकर पुढे आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. या महाराणीत गंभीर जखमी होऊन चंद्रकांत चासकर हे बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

याबाबत किरण चंद्रकांत चासकर यांनी मंचर पोलीस ठाण्यात वडिलांना चुलते, चुलती, चुलत भाऊ यांनी संगणमताने छातीत मारहाण करून ठार मारल्याची फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com