BSC Nursing Admissions: ‘बी.एस्सी. नर्सिंग’च्या प्रवेशप्रक्रियेस सुरुवात
Nursing Course Registration : राज्यातील बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. १७ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी सर्व मूळ कागदपत्रे स्कॅन करून वेळेत अपलोड करावीत, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे.
पुणे : राज्यातील नर्सिंग महाविद्यालयांतील बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) सुरू केली आहे. यासाठी १७ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.