
इसवीसन पूर्व ५६३ मध्ये भगवान बुद्धांचा जन्म हिमालयाच्या पायथ्याशी कपिल वस्तू नगरीतील शाक्य राजा शुद्धोदन व राणी मायादेवी यांच्या उदरी वैशाखी पौर्णिमेला लुंबिनी वनात झाला. त्यावेळी असित मुनींनी बाळाला पाहून भाकीत केले की, हा मुलगा भविष्यात एक तर चक्रवर्ती राजा होईल किंवा सर्वसंगपरित्यागी होऊन जगाला नव्या विचारांची दीक्षा देईल. मुलाचे चक्रवर्ती राजा होणे हे आनंददायीच होते.