
Budhwar Peth red-light area
esakal
पुण्यातील बुधवार पेठ परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येथे १२ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास एका ३९ वर्षीय तरुणाला तीन महिलांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. ऑनलाइन पेमेंटच्या वादातून ही घटना घडली असून, याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात तिन्ही महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.