esakal | पुण्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit_Pawar

- कोरोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार करावेत

पुण्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; म्हणाले...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टर याबाबतचे नियोजन संगणकीय प्रणालीव्दारे करण्यात यावे. तसेच, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे मुंबईच्या धर्तीवर तातडीच्या रुग्णालयांची उभारणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

सरकारी विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित बैठकीत पवार म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात मुंबईत प्रशासनाला यश आले आहे. त्याच धर्तीवर पुण्यात उपाययोजना राबविण्याची गरज आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. नवीन रुग्णांची भर पडणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे. संस्थात्मक क्वारंटाईनच्या ठिकाणी आवश्यक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात. प्रारंभी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबईत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुंबईत कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्था, बेड व्यवस्था तसेच डॉक्टरांचे नियोजन करण्यावर भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे या वेळी उपस्थित होते.

(Edited By : Krupadan Awale)