पिस्तुलाच्या धाकाने 59 लाखांची व्यावसायिकाची फसवणूक; पोलिसासह दोघांवर गुन्हा

A builder was threatened with death at gunpoint who demanded a return on his investment police pune
A builder was threatened with death at gunpoint who demanded a return on his investment police pune
Updated on

पुणे : खासगी वित्तीय संस्थेत पैसे गुंतविल्यास सोने, वाहन देण्याचे आमिष दाखवून एका बांधकाम व्यावसायिकाची 59 लाख 22 हजार रूपयांची फसवणूक करून त्यास पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका पोलिस कर्मचाऱ्यासह एका कंपनीच्या संचालकांविरुद्ध सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस कर्मचारी संतोष सावंत, त्याचा भाऊ व शुभ ट्रेड बीज इंडिया कंपनीचा संचालक अभिजीत धोंडीबा सावंत यांच्यासह कंपनीच्या अन्य संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निखील लक्ष्मणराव मिरगे (वय 29, रा. सरगम सोसायटी, नांदेड सिटी) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Video : खासदार अमोल कोल्हेंनी काढले केंद्र सरकारचे वाभाडे; लोकसभेतील भाषण व्हायरल  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभ ट्रेड बीज या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास दर महिन्याला मोठ्या परताव्यासह कंपनीकडून दुचाकी, कार, सोने असे भरघोस बक्षिस मिळेल, अशा प्रकारची जाहीरात विविध ठिकाणी केली होती. त्यानुसार, मिरगे यांनी संबंधित कंपनीत 63 लाख रुपये गुंतविले होते. त्यानंतर फिर्यादी मिरगे यांना तीन लाख 78 हजार रुपयांचा परतावा देण्यात आला. त्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा परतावा देण्यात आला नाही. मिरगे यांनी त्यांच्याकडे कंपनीकडे परतावा देण्याची सातत्याने मागणी केली. मात्र त्यांना कंपनीकडून प्रतिसाद देण्यात आला नाही. दरम्यान, फिर्यादी मिरगे हे काही दिवसांपुर्वी संबंधीत कंपनीच्या नऱ्हे येथील कार्यालयात गेले होते. त्यावेळी सावंत यांनी मिरगे यांना शिवीगाळ केली. त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. अभिजित सावंत याचा भाऊ संतोष सावंत हा शहर पोलीस दलात आहे. सावंत याने काही गुंडांना हाताशी धरून मिरगे यांच्या महागड्या गाडीचीही तोडफोड केली.
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Inauguration of the 38th Pune Festival by Vice President C.P. Radhakrishnan
Kasba Ganpati Installed in Houston, Texas for Golden Jubilee
Attempt to Murder Using Tractor in Malegaon Shivnagar
Opposition to Mess Price Hike and Demand for University Subsidy
Marathi News Esakal
www.esakal.com