
मंचर : “जल संपदा विभागाची प्रतिमा लोकाभिमुख आणि चांगल्या पद्धतीची होण्यासाठी शेतकऱ्यांबरोबर संवाद वाढला पाहिजे. ज्या शेतक-यांनी पाणीपटटी नियमित भरून शासनास सहकार्य केले आहे त्यांना पैसे भरल्याच्या पावत्या वेळेत पोच कराव्यात. जेणेकरुन शेतक-यांचा विश्वास संपादन होऊन पुढील पाणीपटटी वसुलीस सहकार्य मिळेल. उपसा सिंचन पाणी परवानगी मागणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे पाणी परवाने येत्या १५ दिवसात द्यावेत.” असे हुतात्मा बाबू गेनू सागरचे (डिंभे धरण) कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी सांगितले.