esakal | एेकलंत का ! बुजगावणं सांगतय, रस्त्यांचं गुपित 
sakal

बोलून बातमी शोधा

bujgavan.jpg

एरवी शेतातील पिकांचे पाखरांपासून रक्षण करण्यासाठी बुजगावणे उभे केले जातात. परंतु, दौंड शहरात रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यापासून सावध करण्यासाठी बुजगावणे उभे करावे लागले आहे. दौंड शहरात दौंड- सोलापूर व दौंड- बारामती लोहमार्गाखालील जुनी व नवी कुरकुंभ मोरी नावाने दोन भुयारी मार्ग आहेत.

एेकलंत का ! बुजगावणं सांगतय, रस्त्यांचं गुपित 

sakal_logo
By
प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : एरवी शेतातील पिकांचे पाखरांपासून रक्षण करण्यासाठी बुजगावणे उभे केले जातात. परंतु, दौंड शहरात रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यापासून सावध करण्यासाठी बुजगावणे उभे करावे लागले आहे. 
दौंड शहरात दौंड- सोलापूर व दौंड- बारामती लोहमार्गाखालील जुनी व नवी कुरकुंभ मोरी नावाने दोन भुयारी मार्ग आहेत. रेल्वेच्या आडमुठेपणामुळे दोन्ही मोरींमधील बारमाही वाहणाऱ्या सांडपाण्यातूनच नागरिकांना जावे लागते. चार दिवसांपूर्वी रेल्वेच्या एका ठेकेदाराने नव्या मोरीतून शालीमार चौकाकडे जाणाऱ्या दिशेला केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या मधोमध तीन फूट खोल व पाच फूट रुंद, असा खड्डा खोदला. काम अर्धवट राहिल्याने खड्डा न बुजविता केबल वर काढून ठेवण्यात आली व त्यामध्ये सांडपाणी जमा झाले. खड्ड्याभोवती लोखंडी अडथळे किंवा अन्य उपाययोजना करण्याची तसदी देखील ठेकेदाराने घेतली नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथे अचानक समोर खड्डा दिसल्यानंतर अर्जंट ब्रेक लावल्याने दुचाकी वाहने स्लीप होऊन नागरिकांना गंभीर जखमा झाल्या. काही जागरूक नागरिकांनी खड्ड्याभोवती दगड लावले, परंतु रात्री अंधारात या दगडांना धडकून चारचाकी वाहने खड्ड्यात रूतली. अखेर आज (ता. २८) झुंज मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक बुजगावणे तयार करून ते खड्ड्यात उभे केले. त्यावर ‘ठेकेदार उठलाय निष्पाप नागरिकांच्या जिवावर, दररोज होतायेत अपघात, असे लिहिलेले आहे. 

जेईई ऍडव्हान्सच्या निकालाची तारीख निश्चित; उद्या मिळणार 'आन्सर की'

निष्क्रियतेविरोधात बुजगावणे 
दौंड शहराच्या प्रवेशमार्गांसह शहरातील बहुतांश मार्गांवर अशाप्रकारचे खड्डे आहेत. त्यामुळे या मार्गानेच ये- जा करणारे रेल्वेचे व अन्य शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना या खड्ड्याचे अप्रूप राहिले नाही. पायाभूत सुविधांची वाणवा असणाऱ्या शहरात तरुणाईने निष्क्रयतेविरोधात बुजगावणे उभे केले आहे.