Pune Encroachment Crime : पुढचे दोन महिने पुण्यात बुलडोझर राज! शहरात दररोज अतिक्रमणांवर कारवाई; कोणाचाही दबाव सहन करणार नाही

पुणे शहरातील अतिक्रमणांविरोधात नगरसेवकांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर व हेतूवर प्रश्‍न उपस्थित केल्याने आता आयुक्त नवल किशोर राम यांनी पुढील दोन महिने शहरात रोज अतिक्रमण कारवाई केली जाईल असे केले जाहीर.
Pune encroachment crime

Pune encroachment crime

sakal
Updated on: 

पुणे - शहरातील अतिक्रमणांविरोधात नगरसेवकांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर व हेतूवर प्रश्‍न उपस्थित केल्याने आता आयुक्त नवल किशोर राम यांनी पुढील दोन महिने शहरात रोज अतिक्रमण कारवाई केली जाईल असे जाहीर केले. गरीब असो की श्रीमंत, राजकीय असो की अन्य कोणी सर्वांच्या अतिक्रमणांवर कारवाई करणार.

यामध्ये कोणाचाही दबाव सहन करणार नाही, जर माझ्यावर किंवा अधिकाऱ्यांवर कोणी दबाव टाकला तर त्यांचे नाव जाहीर केले जाईल असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. तसेच हे फ्रंट मार्जिन व पादचारी मार्गावरील अतिक्रमणे काढून टाकल्याने शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न किमान २५ टक्के कमी होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...