esakal | Ajit Pawar : बारामती-इंदापूर तालुक्यातील बुलेट ट्रेनचा मार्ग बदलणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar

बारामती - इंदापूर तालुक्यातील बुलेट ट्रेनचा मार्ग बदलणार नाही

sakal_logo
By
राजकुमार थोरात - सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : मुंबई -पुणे- हैदराबाद बुलेट ट्रेन पंढरपूर मार्गाने जाणार असल्याने इंदापूर व बारामती तालुक्यातून जाणाऱ्या प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या मार्गामध्ये बदल होणार नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

हेही वाचा: T20 World Cup विजेता संघ होणार मालामाल; कोणाला किती रक्कम?

लासुर्णे (ता.इंदापुर) येथे इंदापूरचे माजी सभापती दिवंगत बाबासाहेब पाटील यांना श्रद्धांजली वाहिल्यांनतर लासुर्णे ग्रामस्थांशी बोलत होते.यावेळी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, मोहोळचे आमदार यशवंत माने, छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, अॅड तेजसिंह पाटील, डॉ.योगेश पाटील,सरपंच सागर पाटील उपस्थित होते.

यावेळी पवार यांनी सांगितले की, "मुंबई -पुणे- हैदराबाद बुलेट ट्रेन इंदापूर मार्ग नेण्यासंदर्भात केंद्र सरकारशी चर्चा झाली आहे. मात्र बुलेट ट्रेनने पंढरपूरला जोडायचे असल्यामुळे केंद्र सरकारने बुलेट ट्रेनचा मार्ग बदलण्यास तयार नसल्याने सर्वेक्षण झालेल्या मार्गानेच इंदापूर व बारामती तालुक्यातून बुलेट ट्रेन जाणार आहे. तसेच नीरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरणामुळे कालव्याच्या पाण्याची बचत होत असून पाणी वेगाने पुढे जात असल्याने संपूर्ण नीरा डाव्या कालव्याचे लवकरच अस्तरीकरण करण्यासंदर्भात बारामतीमध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. येणाऱ्या काळामध्ये पाण्याची कमतरता लक्षात घेता संपूर्ण नीरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरण करणे गरजेचे आहे."

हेही वाचा: Dream 11 अ‍ॅप गोत्यात, गुन्हा दाखल; जाणून घ्या काय घडलं?

"कालव्याच्या दोन्ही बाजूच्या भराव्यास आतील बाजूस अस्तारीकरण करुन खालच्या बाजूस पूर्वीप्रमाणे मातीची ठेवल्यास पाणी अडथळा न येता पाणी वेगाने जात आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होवून शेतकऱ्यांना जास्तीजास्त पाणी उपलब्ध होईल. तसेच संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या लासुर्णेमधील उड्डान पुलासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यात येईल.मात्र गडकरी रस्त्याबाबत कोणाचे ऐकत नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. दिवगंत बाबासाहेब पाटील व वडील अनंतराव व चुलते आप्पासाहेब पवार यांच्याबरोबर एकत्र काम केल्याचे सांगून जुन्या आठवणीला उजाळा दिला."

शर्मिला पवार यांनीही घेतली भेट

शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनीही पाटील कुंटूबाला भेट घेवून दिवगंत बाबासाहेब पाटील यांना श्रद्धांजली वाहिली.

loading image
go to top