

Shirur Bullock Cart Race Clash
Esakal
पुण्यात बैलगाडा शर्यतीत झालेल्या वादातून अंगावर थार गाडी घालण्याचा प्रकार घडला आहे. शिरूर तालुक्यातील सणसवाडी इथला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बैलगाडा शर्यतीत झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी एका तरुणाने थेट दोघांना चिरडण्याचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.