esakal | लग्नासाठी सर्जा राजाची जोडी; शेतकऱ्यानं निवडला नवा व्यवसाय
sakal

बोलून बातमी शोधा

farmer business

खेड तालुक्यातील सुभाष पोपट जैद या शेतकर्याने नवरदेव नवरीच्या मिरवणुकीसाठी चक्क सजवलेली बैलजोडी सह बैलगाडी भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरु केला आणि शहरातुनही या बैलगाडीला मागणी वाढली.

लग्नासाठी सर्जा राजाची जोडी; शेतकऱ्यानं निवडला नवा व्यवसाय

sakal_logo
By
सुदाम बिडकर

पारगाव - लग्न समारंभामध्ये अलीकडच्या काही वर्षात जुन्या पध्दतीने विवाह सोहळे साजरा करण्याकडे कल वाढत आहे नवरदेव नवरीच्या मिरवणुकीसाठी पुन्हा जुन्या पध्दतीने सजवलेल्या बैलगाडीचा वापर वाढला आहे. खेड तालुक्यातील सुभाष पोपट जैद या शेतकर्याने नवरदेव नवरीच्या मिरवणुकीसाठी चक्क सजवलेली बैलजोडी सह बैलगाडी भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरु केला आणि शहरातुनही या बैलगाडीला मागणी वाढली. शेतकर्याने सुरु केलेल्या या आनोख्या व्यवसायाचे परिसरात कौतुक होत आहे.

घरापुढे अंगणात किंवा शेतात मांडव घालुन लग्न सोहळे साजरे करणे, पंगती बसवुन जेवणावळी घालणे या लग्नाच्या पध्दती बंद होत आल्या आहेत. त्याऐवजी मंगल कार्यालयामध्ये लग्न होऊ लागली. नवरदेवाची मिरवणुक किंवा नवरदेव नवरीच्या वरातीची मिरवणुक असो ती आताच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सजवलेल्या ट्रॅक्टर त्यानंतर एसी कार मधुन काढण्यात येते. यासोबतच अलीकडच्या काही वर्षात डीजेसाठी बनवलेल्या रथातुन वरात काढली जाऊ लागली. मात्र दुसऱ्या बाजूला उच्चशिक्षित मुला मुलींकडुन पारंपारिक पध्दतीने विवाह सोहळे साजरे करण्याचा कल वाढत आहे.

हे वाचा - बायको माहेराहून येई अन् वाघाचं मांजर होई

वधुसाठी नऊवारी साडी तर वरासाठी धोतर झब्बा, तुरेवाला फेटा या पारंपारिक पोशाखाला पसंती वाढली आहे. मिरवणुकीसाठीही एसी कार ऐवजी घोडा, तसेच सजवलेल्या बैलगाडीला मागणी वाढली आहे. परंतु शेतातील कामे ट्रॅक्टरने होऊ लागल्याने शेतकर्याच्या दारातील बैलजोड्या व बैलगाड्यांच्या जागी ट्रॅक्टर दिसु लागले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बैलगाडा शर्यत बंदीमुळे अनेक वर्षापासुन अनेक हौशी शेतकर्यांच्या गोठ्यातील बैल कमी होऊ लागले. बैलांना शेतातही काम नाही शर्यती बंद त्यामुळे अनेक शेतकर्यांनी बैल विकुन टाकले परंतु जैदवाडी ( ता. खेड ) येथील सुभाष पोपट जैद या शेतकर्याने अडगळीत असलेल्या बैलगाडीला सजवुन ही बैलगाडी लग्नातील मिरवणुकीसाठी भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरु केला त्यांच्या या कल्पनेला अनेकांनी दाद देत त्यांच्या बैलगाडीला मिरवणुकीसाठी मागणी वाढली विशेष करुन भोसरी व चाकण या शहरीभागातुन जास्त मागणी आहे. श्री. जैद मिरवणुक असलेल्या ठिकाणी दोन टेम्पोतुन बैलजोडी व बैलगाडीला घेऊन जातात एका दिवसाचे 15 ते 20 हजार रुपयांपर्यंत भाडे घेतले जाते या व्यवसायातुन सहा तरुणांना रोजगार मिळाल्याचे जैद यांनी सांगीतले.

loading image
go to top