पिंपरीत घरफोडी; दागिन्यांसह अमेरिकन डॉलर चोरीला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 December 2019

- कडीकोयंडा तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने सोने-चांदीच्या दागिन्यांसह अमेरिकन डॉलर  नेले चोरून

पिंपरी : कडीकोयंडा तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने सोने-चांदीच्या दागिन्यांसह अमेरिकन डॉलर चोरून नेले. ही घटना चिंचवडमधील शाहूनगर येथे घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

किशोर नारायण बोपची (रा. शिव को ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी, शाहूनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद असताना दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरटा घरात शिरला. बेडरूममधील लाकडी कपाटातून 73 हजार रूपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने, घड्याळ व अमेरिकन डॉलर लंपास केले. याप्रकरणी गुरुवारी (ता.12) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली.

या मंत्र्यांना मिळणार 'हे' खातं ; अखेर खातेवाटप जाहीर..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burglary in Pimpri Jewelry and American Dollar theft