बर्निंग कारचे गूढ; कशी पेटली, वाहनात किती प्रवासी होते, माहिती उपलब्ध नाही

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

धामणी (ता. आंबेगाव) येथे मंचर-लोणी रस्त्यावर एक मोटार पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र, या वाहनाविषयी रात्री उशिरापर्यंत कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. तसेच, या वाहनाजवळही कोणी आढळून आले नाही. त्यामुळे ते कसे पेटले आणि वाहनात किती प्रवासी होते, याबाबत गुढ निर्माण झाले आहे.

पारगाव - धामणी (ता. आंबेगाव) येथे मंचर-लोणी रस्त्यावर एक मोटार पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र, या वाहनाविषयी रात्री उशिरापर्यंत कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. तसेच, या वाहनाजवळही कोणी आढळून आले नाही. त्यामुळे ते कसे पेटले आणि वाहनात किती प्रवासी होते, याबाबत गुढ निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

धामणी येथील लोणी रस्त्यावर आज (ता. २१) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी वाहनाने पेट घेतला. (प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार मारुती सुझुकी कंपनीची सियाझ कार आहे.) त्यामध्ये संपूर्ण वाहन जळाले आहे. वाहनात कोणीही नसल्याचे नागरिकांनी सांगितले. वाहनाजवळही कोणीही उपलब्ध नव्हते. सुमारे एक ते दीड तास आगीच्या ज्वाळा भडकत होत्या. परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती.

पुण्याच्या दक्षिण उपनगरात कचराकोंडी; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! 

याबाबत माहिती कळताच धामणीचे सरपंच सागर जाधव पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष नितीन जाधव, माजी अध्यक्ष पिंटू पडवळ यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक विलास साबळे यांना माहिती कळविली. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र, वाहन कोणाचे आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: burning car suspense in pune