पुण्याच्या दक्षिण उपनगरात कचराकोंडी; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

अप्पर येथील कचरा प्रकल्पात पन्नास टन सुका कचरा प्रक्रिया करण्याची क्षमता आहे, परंतु फुरसुंगी येथील कचरा प्रकल्प बंद असल्यामुळे अप्पर प्रकल्पातील कचरा तसाच पडून आहे.

बिबवेवाडी (पुणे) : शहराची दाट लोकवस्ती अशी ओळख असलेल्या उपनगरांमध्ये कच-याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे स्थानिकांची डोकेदुखी वाढली आहे. शहरातल्या दक्षिण उपनगरांमध्ये मागील तीन दिवसापासून कचरा साठला आहे. 

मुख्य रस्त्यासह, गल्लोगल्लीत जागोजागी कचरा साठून उपनगरामध्ये बकालपणा वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फुरसुंगी येथील कचरा प्रकल्प बंद असल्याने शहरात कचरा मोठ्या प्रमाणात साठून आहे, दक्षिण उपनगरातील अप्पर बस डेपो येथील सुका कचरा प्रकल्प मागील तीन दिवसांपासून बंद आहे, त्यामुळे येथे कचरा साठून राहिलेला आहे, साठलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

आमदार होण्याचा प्रयत्न करु नको, नाहीतर...; मनसेच्या रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी

अप्पर येथील कचरा प्रकल्पात पन्नास टन सुका कचरा प्रक्रिया करण्याची क्षमता आहे, परंतु फुरसुंगी येथील कचरा प्रकल्प बंद असल्यामुळे अप्पर प्रकल्पातील कचरा तसाच पडून आहे. बुधवारपासून प्रकल्पात कचऱ्याच्या गाड्या उभ्या असून बस डेपोमध्ये येणाऱ्या बस ला त्यामुळे अडचण येत आहे. 
अनिल जगताप ( रहिवासी, अप्पर बसडेपो ) : प्रकल्पात कचरा साठून राहिल्यामुळे सर्वत्र घाण वास येत होता, डेपोतील प्रवाशांना व राहिवाश्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 'फुरसुंगी कचरा डेपो बंद असल्याने सुका कचरा पाठवता येत नाही, येथील कचरा तात्पुरता दुसऱ्या प्रकल्पात पाठवून अप्पर प्रकल्प सुरू करणार आहे.'   - प्रवीण वडवे (अभियंता, कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालय)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The dry waste disposal plant at the Upper Bus Depot closed past three days

Tags
टॉपिकस
Topic Tags: